उत्तर तांबवे - गमेवाडी रस्त्याची चाळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:50 AM2021-02-20T05:50:07+5:302021-02-20T05:50:07+5:30

आरेवाडी ते गमेवाडी हा रस्ता अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होता. त्या रस्त्यावर निधी पडला व खडीकरणही झाले. ...

North Tambwe - Gamewadi Road Sieve | उत्तर तांबवे - गमेवाडी रस्त्याची चाळण

उत्तर तांबवे - गमेवाडी रस्त्याची चाळण

Next

आरेवाडी ते गमेवाडी हा रस्ता अनेक दिवसांपासून दुर्लक्षित होता. त्या रस्त्यावर निधी पडला व खडीकरणही झाले. ते ठेकदाराने व्यवस्थित न केल्याने रस्ता खराब झाला आहे. आता रस्त्याने प्रवास करताना कसरत करावी लागत आहे.

बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. रस्त्याची पहाणी करून रस्ता त्वरित दुरुस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

वानरांचा धुमाकूळ; शेतकरी हतलब

तांबवे : तांबवे परिसरात वानरांकडून पिकांचे नुकसान केले जात आहे. त्यामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. रब्बी हंगामातील पिके, हरभरा, गहू, भुईमूग तसेच भाजीपाला पिकांचे नुकसान वानरांकडून होत आहे. सुमारे चाळीस-पंचेचाळीस वानरे एका कळपात आहेत, असे शेकडो कळप डेळेवाडी, आरेवाडी, पाठरवाडी, गमेवाडी, साजूर, उत्तर तांबवे, गारवडे, किरपे साकुर्डी, म्होप्रे, बेलदरे, वसंतगड, पश्चिम सुपने गावांमध्ये व शिवारात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात पिके घेणे कठीण झाले आहे. काढणीस आलेली पिके पदरात घेता येत नाही त्यामुळे शेतकरी वैतागले आहेत. वनविभागाने वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थ करीत आहेत.

Web Title: North Tambwe - Gamewadi Road Sieve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.