पाण्यासाठी कसलीही हयगय नको , प्रशासनाला सूचना: चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 09:24 PM2018-10-13T21:24:57+5:302018-10-13T21:27:13+5:30

‘संभाव्य काळात पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रमाने कराव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये कसलीही हायगय होणार नाही, याची काळजी घ्यावी,’

 Not to drink water, notice to the administration: Chandrakant Patil | पाण्यासाठी कसलीही हयगय नको , प्रशासनाला सूचना: चंद्रकांत पाटील

पाण्यासाठी कसलीही हयगय नको , प्रशासनाला सूचना: चंद्रकांत पाटील

googlenewsNext
ठळक मुद्देमाण तालुक्यातील गावांना भेटी; पिकांची केली पाहणीपाण्याचे नवनवे स्त्रोत शोधून काढून त्याच्या बळकटीकरणावर भर दिला जाईल.

दहिवडी : ‘संभाव्य काळात पिण्याच्या आणि जनावरांच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, या दृष्टीने प्रशासनाने आवश्यक उपाययोजना प्राधान्यक्रमाने कराव्यात. पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यामध्ये कसलीही हायगय होणार नाही, याची काळजी घ्यावी,’ अशा सूचना देत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

माण मालुक्यातील वडगाव, बिजवडी, अनभुलेवाडी, थदाळे या चार गावांना शनिवारी महसूलमंत्र्यांनी शनिवारी भेट देऊन पिकाची पाहणी केली आणि शेतकºयांबरोबर पीक, पाण्याबद्दल चर्चा केली. यावेळी आमदार जयकुमार गोरे, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक अनिल देसाई, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनील बोरकर, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार बी. एस. माने, संबंधित विभागाचे जिल्हास्तरावरील आणि तालुकास्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

महसूलमंत्र्यांनी वडगाव येथील शेतकरी दादासाहेब ओंबासे यांच्या शेतात जाऊन पिकाची पाहणी केली तर बिजवडी येथील शेतकरी हनुमंत भोसले यांच्या डाळिंबाच्या शेताची पाहणी केली. अनभुलेवाडी येथील चंद्र्रकांत कदम यांच्या ज्वारीच्या पिकाची पाहणी केली तर थदाळे येथील कृष्णा खंदारे यांच्या मक्याच्या शेतीची पाहणी केली. यावेळी शासन शेतकºयांच्या पाठीशी असून, दुष्काळाच्या कचाट्यात सापडलेल्या सर्व शेतकºयांना सर्व प्रकाराची मदत मिळेल, अशी ग्वाही महसूलमंत्र्यांनी यावेळी दिली.

ते म्हणाले, ‘पिकांच्या उत्पादनातील घटीची शासनस्तरावर निश्चित दखल घेतली जाईल. त्यानुसार आवश्यक उपाययोजना केल्या जातील. मात्र मार्चनंतर पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता गृहित धरून पाणी पुरवठा योजनांची गावनिहाय वस्तुस्थिती जाणून घेऊन पाण्याचे नवनवे स्त्रोत शोधून काढून त्याच्या बळकटीकरणावर भर दिला जाईल.’

गावातील पाणीपुरवठा योजनांचा दर महिन्याला यंत्रणांनी आढावा घ्यावा. पिण्याच्या पाणीपुरवठ्याची तात्पुरत्या उपाययोजनांना प्राधान्य देण्याबरोबरच दीर्घकालीन उपाययोजनांचेही नियोजन करा, अशी सूचनाही त्यांनी केली. टंचाईग्रस्त गावातील पिकांची महसूल आणि कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शेतावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून सर्व्हे करावा, अशी सूचना त्यांनी केली.

टंचाईचा अहवाल तयार करणार
पावसाअभावी टंचाईसदृश्य परिस्थिती निर्माण झालेल्या गावात आवश्यक उपाययोजना करण्यास शासनाने प्राधान्य दिले असून, या दुष्काळाच्या झळा बसलेल्या तालुक्यातील प्रत्येकी पाच गावांमध्ये मंत्रिमंडळातील सदस्यामार्फत प्रत्यक्ष पाहणी करून शासनास वस्तुनिष्ठ अहवाल देण्यात येणार आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील चार गावांना आज भेट देऊन तेथील टंचाई परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली आहे. चारही गावांत पावसाने दडी मारल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला आहे. या सर्व परिस्थितीचा वस्तुनिष्ठ अहवाल शासकीय यंत्रणामार्फत घेतला जाईल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

पाण्याचे स्त्रोत बळकट करणार
गावकºयांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी पाणीपुरवठा योजनांचे अधिकार जिल्हाधिकाºयांना दिले आहेत.
संभाव्य काळात पाण्याचा तुटवडा पडणार नाही, याची यंत्रणांनी काळजी घ्यावी.
पाणी पुरवठा योजनांचा सूक्ष्म आराखडा तयार करून त्यानुसार अंमलबजावणी करावी.
दरमहा पाणीपुरवठा योजनांचा तसेच पिण्याच्या पाणीपुरवठ्याचा आढावा घ्यावा.
पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल.

 

Web Title:  Not to drink water, notice to the administration: Chandrakant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.