कऱ्हाडातील रस्त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2021 04:29 AM2021-05-30T04:29:43+5:302021-05-30T04:29:43+5:30

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कऱ्हाडातील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ५० लाख एवढा भरीव ...

Notice to the authorities regarding the road in Karhada | कऱ्हाडातील रस्त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना

कऱ्हाडातील रस्त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना

Next

खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून कऱ्हाडातील कोल्हापूर नाका ते कृष्णा पूल रस्त्याच्या कामासाठी तीन कोटी ५० लाख एवढा भरीव निधी मंजूर झाला आहे. कऱ्हाड ते विटा हा मार्ग कऱ्हाड शहरातून जात असून कोल्हापूर नाका ते कृष्णा पुलापर्यंतचा रस्ता अत्यंत खराब झाला होता. रस्त्यात ठिकठिकाणी खड्डे पडल्याने नागरिकांना प्रवास करताना गैरसोयीचे ठरत होते; तर रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाल्याने या मार्गावरील वाहनांसाठी अडथळा निर्माण होऊन शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत होत होती. त्यामुळे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली होती. या मागणीनुसार खासदार श्रीनिवास पाटील यांनी हा भरीव निधी मंजूर करून घेतला आहे.

सध्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. शुक्रवारी खासदार श्रीनिवास पाटील यांनी सुरू असलेल्या कामाची पाहणी प्रत्यक्ष जागेवर जाऊन केली. तसेच नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने या कामाचा अधिकाऱ्यांकडून आढावा घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी जयंत पाटील, जयंत बेडेकर, सारंग पाटील, रणजितसिंह पाटील, पोपटराव साळुंखे, सद्दाम आंबेकरी, शिवाजीराव पवार, गंगाधर जाधव, प्रशांत शिंदे, अनिल धोत्रे व उपअभियंता निखिल पानसरे उपस्थित होते.

दरम्यान, लॉकडाऊनमुळे कऱ्हाड शहरातील या रस्त्यावरील रहदारी बंद असल्याने सदरच्या कामास गती मिळाली आहे. तसेच कामाची गुणवत्ता उत्तम असून, हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

फोटो : २९केआरडी०३

कॅप्शन : कऱ्हाडातील कोल्हापूर नाका ते कृष्णा नाका यादरम्यानच्या रस्त्याची पाहणी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केली.

Web Title: Notice to the authorities regarding the road in Karhada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.