वाळू उत्खननप्रकरणी १९ लाखांच्या दंडाची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 05:32 PM2020-12-22T17:32:28+5:302020-12-22T17:35:24+5:30
sand Satara- कुरणेवाडी येथील कोपरआळा परिसरात ४७ ब्रास वाळू व बामणकी मळ्यानजीक ओढ्यात सहा ब्रास झालेल्या वाळू उत्खननाचा तलाठ्यांनी गुरुवार, दि. ३ रोजी पंचनामा केला होता. या वाळू उत्खननाची गंभीर दखल घेत तहसीलदार बी. एस. माने यांनी धडक कारवाई केली. संबंधितांना १९ लाख १ हजार ६५७ रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे वाळू उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
कुकुडवाड : कुरणेवाडी येथील कोपरआळा परिसरात ४७ ब्रास वाळू व बामणकी मळ्यानजीक ओढ्यात सहा ब्रास झालेल्या वाळू उत्खननाचा तलाठ्यांनी गुरुवार, दि. ३ रोजी पंचनामा केला होता. या वाळू उत्खननाची गंभीर दखल घेत तहसीलदार बी. एस. माने यांनी धडक कारवाई केली. संबंधितांना १९ लाख १ हजार ६५७ रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे वाळू उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.
कुरणेवाडी येथील गणेश कलाप्पा आटपाडकर, पोपट बापू आटपाडकर व उत्तम बापू आटपाडकर यांना ही नोटीस दिलेली आहे. त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत चोवीस तासांचा अवधी दिला आहे.
याबाबत माहिती अशी की, कुरणेवाडी येथील कोपरआळा व बामणकी मळ्यानजीक ओढ्यात गणेश आटपाडकर, पोपट आटपाडकर व उत्तम आटपाडकर हे ३ डिसेंबर रोजी ट्रँक्टर व ट्राँलीद्वारे वाळू उत्खनन व वाहतूक करीत असताना तलाठ्यांना आढळले. तलाठ्यांनी उत्खनन केलेल्या ओढ्यातील जागेचा पंचनामा केला. त्यात कोपरआळा येथ ४७ तर बामणकी मळ्यानजीकच्या ओढ्यात ६ ब्रास असे ५३ ब्रास वाळू उत्खनन केल्याचे दिसून आले.
याबाबत तहसीलदार कार्यालयात तलाठी अहवाल पाठविला होता. त्यानंतर तहसीलदार बी. एस. माने यांनी गणेश आटपाडकर, पोपट आटपाडकर व उत्तम आटपाडकर यांना १९ लाख १ हजार ६५७ रुपये दंडाची नोटीस दिलेली आहे.
कुरणेवाडी हद्दीतील ओढ्यातून ५३ ब्रास वाळू उत्खनन केल्याबाबत ६ हजार गौण खनिजांचे प्रतिब्रास बाजार मुल्यानुसार राँयल्टी प्रतिब्रास ५ हजार ८६९ रूपये प्रमाणे बाजारमुल्याच्या पाचपट मिळून दंडाची रक्कम १९ लाख १ हजार ६५७ रुपये दंडाच्या रक्कमेची नोटीस बजावली आहे.