सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

By नितीन काळेल | Published: January 31, 2024 06:54 PM2024-01-31T18:54:21+5:302024-01-31T18:55:08+5:30

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवल्याचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने ...

Notice to Members of Sahyadri Factory for disposal elsewhere, Farmers association protests in front of Satara collector office | सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवल्याचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटीस रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे.

याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सह्याद्री साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाट अशी नोटीस पाठविली आहे. कारखान्यास ऊस न दिल्यास, कारखान्याचे नुकसान झाल्यास भरपाई म्हणून दंड वसूल करण्यास तुम्ही पात्र आहात, अशी ही नोटीस पाठविण्यात आलेली आहे. याबाबत १५ दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केलेले आहे. असे असलेतरी ५३ वर्षांत कारखान्याला सभासद दिसले नाहीत. कारखाना नफ्यात म्हणून कधीही एक रुपयाही बोनस दिला नाही. 

मागील दोन वर्षांत तर डिस्टीलरी व मशीनरीचे काम सुरू असताना मोजक्या यंत्रणेवर कारखाना सुरू होता. त्यावेळेसही कारखान्याने तुम्ही ऊस कुठे घालता म्हणून शेतकरी आणि सभासदांची विचारपूस केली नाही. आता कारखान्याने सभासदांसाठी चुकीची नोटीस काढली आहे.

कारखान्याने असे न करता नोंद करतील त्यांचा ऊस वेळेवर न नेल्यास कारखाना जबाबदार राहील. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कारखाना भरपाई देईल. शेतकरी आणि सभासद दुसऱ्या कोणत्याही कारखान्याला ऊस घालणार नाहीत, अशी नोटीस द्यायला हवी होती. कारण, सातारा तालुक्यातील तारगाव पंचक्रोशीत सह्याद्री कारखान्याच्या फक्त पाच टोळ्याच कार्यरत आहेत. तर इतर कारखान्यांच्या कोणाच्या १५ तर कोणाच्या ४० टोळ्या आहेत. असे असेलतर सह्याद्री कारखान्याला वेळेत कसा ऊस जाईल. कारण, मुळात कारखान्याची यंत्रणा आणि टोळ्या कमी आहेत. त्याचा दोष सभासदांच्या माश्यावर मारु नये. तसेच यातून कारखान्याचे सभासदत्व घालविण्यासाठीच हे नियोजन आहे. यासाठी सभासदांना आलेली नोटीस रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात शेतकरी संघटनेचे शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तर अध्यक्ष वसीम इनामदार, लक्ष्मण मोरे, सुहास पाटील, परबती तावरे, अमिर मुल्ला, सज्जन पवार, महिपती घाडगे, दस्तगीर इनामदार, युनूस इनामदार, दिलावर पटेल, जावेद इनामदार आदी सहभागी झाले आहेत.

Web Title: Notice to Members of Sahyadri Factory for disposal elsewhere, Farmers association protests in front of Satara collector office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.