पीपीई किट घालून आता कारखान्यांसमोर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:42 AM2021-05-06T04:42:15+5:302021-05-06T04:42:15+5:30

सातारा :‘साखर कारखान्यांना ऊस घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना बिल अदा करणे हे एफआरपी कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील ...

Now agitation in front of factories wearing PPE kits | पीपीई किट घालून आता कारखान्यांसमोर आंदोलन

पीपीई किट घालून आता कारखान्यांसमोर आंदोलन

Next

सातारा :‘साखर कारखान्यांना ऊस घातल्यानंतर १४ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना बिल अदा करणे हे एफआरपी कायद्यानुसार बंधनकारक आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी कोरोनाचा फायदा घेऊन चार महिन्यांपासून शेतकऱ्यांना देणी दिली नाहीत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कारखान्यांनी दोन दिवसात देणी अदा करावीत. अन्यथा प्रत्येक कारखान्याच्या गेटसमोर कोरोना प्रतिबंधात्मक पीपीई किट घालून आंदोलन करणार आहे,’ असा इशारा रयत क्रांती संघटनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी दिला आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात प्रकाश साबळे यांनी म्हटले आहे की, सातारा जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची देणी थकवली आहेत. त्यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्यांना ऊस पिकाशिवाय इतर उत्पन्नाचे साधन नाही. लागवडीसाठी काढलेले कर्ज तसेच कामगार व उदरनिर्वाह करण्यासाठी बँका व इतर माध्यमातून कर्जे काढावी लागली. त्या कर्जांची परतफेड करण्यासाठी शेतकऱ्यांच्यामागे तगादा सुरू आहे. असे असताना कारखान्यांना ऊस घालून चार महिन्यांचा अवधी उलटूनही अद्याप बिल जमा नाहीत. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आलाय. आता परिस्थिती सहनशक्तीच्या पलीकडे गेली आहे. कारखान्यांवर कारवाई करण्याचे अधिकार असलेली यंत्रणा गप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वतःची लढाई स्वतः लढावी लागणार असून त्यादृष्टीने आता दोन दिवसात कारखान्यांनी देणी अदा करावीत अन्यथा कोरोनाचे सर्व नियम पाळून व कोरोना प्रतिबंधात्मक पीपीई किट घालून आंदोलन करणार आहे.

Web Title: Now agitation in front of factories wearing PPE kits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.