आता महिनाभर परीक्षेचं ओझं..!

By admin | Published: February 22, 2015 08:33 PM2015-02-22T20:33:49+5:302015-02-23T00:22:31+5:30

बारावीची परीक्षा सुरू : जिल्ह्यात ४२ केंद्रे ; यावर्षीपासून दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका

Now the burden of the exam for a month ..! | आता महिनाभर परीक्षेचं ओझं..!

आता महिनाभर परीक्षेचं ओझं..!

Next

सातारा : शालेय जीवनातील दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण असते. बारावीनंतर पुढे काय करायचे ते ठरविले जाते. अशा महत्त्वपूर्ण असणाऱ्या बारावीच्या वार्षिक परीक्षेला शनिवारपासून प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार विद्यार्थी ४२ केंद्रांतून ही परीक्षा देत आहेत. तर यावर्षीपासून प्रथमच विद्यार्थ्यांना दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. दरम्यान, ही परीक्षा दि. २६ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. तोपर्यंत अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असणार आहे.
शालेय जीवनात दहावी आणि बारावीचे वर्ष महत्त्वाचे असते. या दोन्हीही परीक्षा बोर्डामार्फत घेण्यात येतात. या परीक्षेतील यशावरच पुढील शिक्षण अवलंबून असते. विशेष करून बारावीला अधिक महत्त्व आहे. बारावीनंतर डीएड करायचे की कॉलेज, का इंजिनिअरिंग, मेडिकलला जायचे हे गुण आणि इच्छेनुसार ठरविले जाते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेच्या अभ्यासाचं ओझं विद्यार्थ्यांवर असतं तसेच पालकांनाही त्याची काळजी असते. शनिवारपासून राज्यभरात बारावीची वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. सातारा जिल्ह्यातील सुमारे ३८ हजार परीक्षार्थी आहेत. विविध ४२ केंद्रांतून ते परीक्षा देत आहेत. ही परीक्षा सुमारे एक महिना चालणार आहे. दि. २६ मार्चला बारावीचा शेवटचा पेपर असणार आहे. जिल्ह्यातील बारावीची परीक्षा सुरळीत व्हावी, यासाठी सहा भरारी पथके तयार करण्यात आली आहेत. यामध्ये माध्यमिक, प्राथमिक, निरंतर शिक्षण विभाग तसेच महिलांचेही एक विशेष भरारी पथक असणार आहे. यावर्षी प्रथमच परीक्षा सुरू होण्यापूर्वी दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका देण्यात येत आहे. कारण, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचे आकलन व्हावे, प्रश्न समजून घेता यावेत, हा उद्देश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रावर अखंडित वीजपुरवठा ठेवण्यात आला आहे. तसेच काही ठिकाणची वीज गेल्यास जनरेटरची सोयही करण्यात आलेली आहे, असे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)

दहावीची परीक्षा दि. ३ मार्च पासून...
बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. ती दि. २६ मार्चपर्यंत चालणार आहे. त्याचबरोबर दहावीची वार्षिक परीक्षा ही दि. ३ मार्चपासून सुरू होत आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील सुमारे ४२ हजार विद्यार्थी बसलेले आहेत. विविध १०९ केंद्रांतून दहावीची परीक्षा होत आहे. दहावीच्या परीक्षेसाठीही भरारी पथके तयार करण्यात आली आहेत.
सातारा जिल्ह्यातील ३८ हजार विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले आहेत. शनिवारपासून परीक्षा सुरळीतपणे सुरू झालेली आहे. गैरप्रकार रोखण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. पहिल्या पेपरला कोठेही अडचण आलेली नाही.
- देविदास कुलाळ, शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग

Web Title: Now the burden of the exam for a month ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.