‘एटीएम’चा अतिवापर ग्राहकांसाठी आत्ता महागात

By admin | Published: January 6, 2017 11:07 PM2017-01-06T23:07:15+5:302017-01-06T23:07:15+5:30

मोफतची मुदत संपली : पुढील कार्यवाहीबाबत बँकाही आदेशाच्या प्रतीक्षेत

Now the cost for the ATM's overuse customers | ‘एटीएम’चा अतिवापर ग्राहकांसाठी आत्ता महागात

‘एटीएम’चा अतिवापर ग्राहकांसाठी आत्ता महागात

Next

सातारा : नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी शुल्क लागणार नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे ‘दिसले एटीएम की काढ पैसे’ अशी सवय लागली आहे. मोफतची मुदत संपल्याने भविष्यात यासाठी शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे सवयीवर आवर घालावा लागणार आहे.
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी चलनातून पाचशे व हजार रुपयांच्या नोटा ८ नोव्हेंबर रोजी रद्द ठरविल्या. त्यानंतर स्वत:कडील जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा खात्यात जमा करण्यासाठी ग्राहकांच्या बँकेत रांगा लागल्या होत्या. बँकेतून चलनातील नोटा काढल्या जात होत्या. त्या तुलनेते भरणा होत नसल्याने आर्थिक कोंडी झाली. चलनात आलेल्या पाचशे व दोन हजार रुपयांच्या नवीन नोटांचा आकार वेगळा असल्याने एटीएममधील ट्रे बदलणे गरजेचे होते. त्यामुळे असंख्य एटीएम बंद अवस्थेत होते.
या काळात ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत कोणत्याही एटीएममधून पैसे काढले तरी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे एटीएम केंद्र दिसले की, रांगेत उभे राहण्याची सवयच लागली होती. पैसे काढण्यावरही मर्यादा असल्याने त्यावरही अनेकांनी उपाय शोधले आहेत. दोन-तीन बँकांमध्ये खाते उघडून एटीएम घेतले आहेत. प्रत्येक एटीएममधून दररोज पैसे काढले जात होते.
सेवानिवृत्ती वेतन व पगार काढण्यासाठी आता पुन्हा बँका व एटीएमसमोर रांगा दिसणार आहेत. कोणत्याही एटीएममधून पैसे काढण्यासाठी दिलेली मुदत संपली असल्याने आता पहिल्या ठराविक व्यवहारानंतर शुल्क आकारले जाऊ शकते. त्यामुळे आतापासूनच सावधानता बाळगणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)

बंद एटीएमची साठी
नोटाबंदीच्या निर्णयाला दोन महिने झाले आहेत. साठ दिवसांनंतरही सातारा जिल्ह्यातील अनेक एटीएम बंद आहेत. त्यामुळे अनेक बँकांच्या ग्राहकांना इतर बँकांच्या एटीएमवर अवलंबून राहावे लागणार आहे. त्यामुळे सर्व एटीएम सुरू केल्यानंतरच हा निर्णय घ्यावा, अशी मागणी आहे.

Web Title: Now the cost for the ATM's overuse customers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.