आता कोण कारभारी अन् कोण घरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:32+5:302021-01-17T04:33:32+5:30

कातरखटाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार वाॅर्डांतून ११ जागांसाठी एकूण २२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. उमेदवारांचे भवितव्य उद्या, सोमवारी ...

Now who is in charge of the house? | आता कोण कारभारी अन् कोण घरी?

आता कोण कारभारी अन् कोण घरी?

googlenewsNext

कातरखटाव : येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी चार वाॅर्डांतून ११ जागांसाठी एकूण २२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. उमेदवारांचे भवितव्य उद्या, सोमवारी स्पष्ट होणार असून, उमेदवारांसह कार्यकर्ते, मतदारांची उत्सुकता शिगेला ताणली आहे. त्यामुळे आता कोण कारभारी होणार आणि कोण घरी जाणार, अशी खुमासदार चर्चा परिसरात, खेड्यापाड्यात होऊ लागली आहे.

माजी सरपंच तानाजीशेठ बागल यांचे श्री जनाईदेवी ग्रामविकास पॅनेल आणि अजित सिंहासने व विशाल बागल यांचे श्री कात्रेश्ववर ग्रामविकास पॅनेलमध्ये मुख्य लढत असून, कातरखटाव निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी आपलाच विजय निश्चित, असा ठाम आत्मविश्वास बाळगल्याने अधिक चुरस दिसून येत आहे. दोन्ही पॅनेलनी प्रचारात दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस केल्याने मतदार कोणाचं पारडं जड करणार किंवा कोणत्या उमेदवाराला पसंती देणार हे उद्या, सोमवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

भागातील मतदानाचा टक्का पाहता एनकूळमध्ये ७० टक्के, बोबाळे ८०, डांभेवाडी ८२, तडवळे ८१, कानसेवाडी ७०, बनपुरी ६५, येरळवाडी ८५ टक्के, वार्डनिहाय मतदानाची टक्केवारी वाढली असून, मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तरी ‘आमका म्हणतोय विजय आमचाच.. आणि तमकाही म्हणतोय विजय आमचाच, असा चर्चेचा सूर असला तरी कोण कारभारी होणार आणि कोण घरी जाणार, हे निश्चित उद्या, सोमवारी दुपारपर्यंत कळणार आहे.

Web Title: Now who is in charge of the house?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.