corona virus :बाधित कर्मचारी संख्या सातशेच्या उंबरठ्यावर...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 06:22 PM2020-11-04T18:22:19+5:302020-11-04T18:24:00+5:30
Coronavirus, zp, sataranews सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून आता बाधित आकडा ६९१ झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत १२ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, ६२२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.
सातारा : जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून आता बाधित आकडा ६९१ झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत १२ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, ६२२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावाबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ६९१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातारा तालुक्यात कार्यरत १३० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाडमध्ये ११२, कोरेगाव १०६, खटाव ५९, खंडाळा २९, जावळी २७, पाटण ७६, फलटण ४३, महाबळेश्वर ३३, माण २८ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ४८ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा १२ वर पोहोचला आहे.
आतापर्यंत पाटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी तिघां कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा व फलटण तालुक्यात कार्यरत प्रत्येकी २ आणि कोरेगाव, जावळी तालुक्यात कार्यरत प्रत्येकी १ कर्मचारी कोरोनाने मृत्युमुखी पडला आहे.
कोरोनावर मात केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तालुकानिहाय...
जिल्हा परिषदेच्या ६९१ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ६२२ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील ९४ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १२२, पाटण ६८, कऱ्हाड १०८, महाबळेश्वर ३३, खटाव ४५, वाई ४३, फलटण ३४, खंडाळा २९, जावळी २३ आणि माण तालुक्यात कार्यरत २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.