जिल्हा परिषदेतील बाधित कर्मचारी संख्या ८०० पार..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:40 AM2021-04-07T04:40:42+5:302021-04-07T04:40:42+5:30

लोगो : जिल्हा परिषदेतून... लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदे ...

The number of affected employees in Zilla Parishad has crossed 800. | जिल्हा परिषदेतील बाधित कर्मचारी संख्या ८०० पार..

जिल्हा परिषदेतील बाधित कर्मचारी संख्या ८०० पार..

Next

लोगो : जिल्हा परिषदेतून...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचारीही बाधित होण्याचे प्रमाण वाढत आहे. आतापर्यंत जिल्हा परिषदेतील ८०६ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला असून १७ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्याचबरोबर ७७९ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण गेल्यावर्षी मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावाबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. आतापर्यंत अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. मंगळवारपर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ८०६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत सातारा तालुक्यात कार्यरत १३७ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर क-हाडमध्ये ११०, कोरेगाव १३४, खटाव ७४, खंडाळा ३७, जावळी २७, पाटण ८३, फलटण ५५, महाबळेश्वर ३३, माण ५३ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ६३ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर कोरोना बळींचा आकडा १७ वर पोहोचला आहे.

कोरोना विषाणूमुळे खटाव तालुक्यात कार्यरत सर्वाधिक ५ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर पाटण तालुक्यातील तिघांचा तर कोरेगाव, जावळी, फलटण आणि सातारा तालुक्यातील प्रत्येकी २ व माण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या एका कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे.

चौकट :

१० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू...

जिल्हा परिषदेच्या ८०६ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ७७९ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील १३१ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १३४, पाटण ८०, क-हाड ११०, महाबळेश्वर ३३, खटाव ६७, वाई ६०, फलटण ५०, खंडाळा ३७, जावळी २५ आणि माण तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ५२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या १० कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

....................................................

Web Title: The number of affected employees in Zilla Parishad has crossed 800.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.