कोरोना बाधितांचा आकडा आठ हजारांवर, नवे ३९२ रुग्ण निष्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2020 02:54 PM2020-08-19T14:54:28+5:302020-08-19T14:56:59+5:30

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच दिवसभरात नवीन ३९२ रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे बाधितांचा आकडा ८२७५ वर पोहोचला. तर ११ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्याही वाढून २६० झाली.

The number of corona cases is over 8,000, with 392 new cases | कोरोना बाधितांचा आकडा आठ हजारांवर, नवे ३९२ रुग्ण निष्पन्न

कोरोना बाधितांचा आकडा आठ हजारांवर, नवे ३९२ रुग्ण निष्पन्न

Next
ठळक मुद्देकोरोना बाधितांचा आकडा आठ हजारांवर, नवे ३९२ रुग्ण निष्पन्न ११ जणांचा मृत्यू; बळींची संख्या २६०, २२६ जणांना सोडले घरी

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच दिवसभरात नवीन ३९२ रुग्ण निष्पन्न झाले. त्यामुळे बाधितांचा आकडा ८२७५ वर पोहोचला. तर ११ जणांचा मृत्यू झाल्याने बळींची संख्याही वाढून २६० झाली. दरम्यान, कोरोनावर मात केल्याने २२६ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ४४४९ नागरिक बरे झाले आहेत. तर ७४३ नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधित तसेच मृत्यूमुखी पडणाऱ्यांचा आकडा वाढतच चालला आहे. सोमवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालानुसार २९० नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर मंगळवारी दिवसभरात ३९२ कोरोना बाधित आढळले आहेत.

सोमवारी रात्रीच्या अहवालानुसार फलटण तालुक्यात २८ रुग्ण आढळले. फलटण शहराबरोबरच मलटण, मांडवखडक, विडणी, लक्ष्मीनगर, कोळकी, तरडगाव, तावडी, तामखाडा, जिंती, निंभोरे, गिरवी आदी गावांत हे रुग्ण आढळून आले. तर वाई तालुक्यात शहराबरोबरच कवठे, उडतारे, पांढऱ्याचीवाडी, बावधन, पाचवड, शेंदूरजणे, धोम कॉलनी, ओझर्डे कदमवाडी आदी ठिकाणी मिळून २६ नवीन रुग्ण सापडले.

सातारा तालुक्यातही नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली. सातारा शहरातील दौलतनगर, कामाठीपुरा, शाहूनगर, भवानी पेठ, तामजाईनगर, विलासपूर, शनिवार पेठ, गुरूवार पेठ, सोमवार पेठ, गोडोली आदींबरोबरच तालुक्यातील वळसे, खेड, नेले-किडगाव आदी ठिकाणी रुग्ण आढळून आले. अतित येथे तर १५ रुग्ण निष्पन्न झाले आहेत.

कºहाड तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आढळले. यामध्ये कºहाड शहराबरोबरच मलकापूरमध्ये संख्या अधिक आहे. सैदापूर, रेठरे कारखाना, आगाशिवनगर, नांदलापूर, गोटे, आटके, वडगाव, काले, विरवडे, उंब्रज, तळबीड, चरेगाव, गोवारे, मालखेड, मसूर, चोरे, वाघेरी, कापील, साकुर्डी, कार्वे, टाळगाव, गोळेश्वर आदी गावांतही रुग्ण आढळले. पाटण तालुक्यातील कालगाव, पाटण, पंचमोरगिरी, दिवशी बुद्रुक आदी गावांत कोरोना रुग्ण स्पष्ट झाले.

महाबळेश्वर तालुक्यात एका नवीन रुग्णाची नोंद झाली. तर कोरेगाव तालुक्यातील ५ रुग्ण आढळले. कोरेगाव, विखळे, नायगाव, कोरेगाव तहसील कार्यालय व रहिमतपूर येथील हे रुग्ण आहेत.

खटाव तालुक्यात १६ रुग्ण आढळले. यामध्ये विसापूर, मोराळे, वडूज, वांझोळी, खटाव, तडवळे, उंबर्डे, मायणी, राजाचे कुर्ले येथील रुग्णांचा समावेश आहे. माण तालुक्यात म्हसवड आणि मासाईवाडी येथे मिळून ४ रुग्ण आढळून आले. जावळी तालुक्यात नवीन १६ रुग्ण निष्पन्न झाले.

यामधील १२ हे मोरघर येथील असून उर्वरित रुग्ण हे सरताळे, मेढा, गांजे येथील आहेत. त्याचबरोबर इतर जिल्ह्यातील म्हणजे चव्हाणवाडी-आष्टा (सांगली) येथील १, रिळे, ता. शिराळा १ आणि किल्ले मच्छिंद्रगड, ता. वाळवा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

सातारा तालुक्यातील चौघे मृत...

जिल्ह्यात कोरोना बाधित ११ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये सातारा तालुक्यातील सर्वाधिक चौघेजण मृत झाले आहेत. तर महाबळेश्वरमधील दोघांचा समावेश आहे. दरम्यान, साताऱ्यातील दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात सरताळे, ता. जावळी येथील ५६ वर्षीय महिला, कऱ्हाड शहरातील ४८ वर्षीय महिला, गोडोली (सातारा) येथील ७२ वर्षांचा पुरुष, सातारा तालुक्यातील नेलेमधील ७५ वर्षीय महिला, फलटण येथील ६० वर्षीय महिला आणि राजेवाडी निगडी, ता. सातारा येथील ७० वर्षांचा वृध्द अशा सहा बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर कऱ्हाडमधील खासगी रुग्णालयात पाटण येथील ६९ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला.

वाई येथील एका खासगी रुग्णालयात महाबळेश्वरच्या ८० वर्षीय पुरुष व साताऱ्यातीलही खासगी रुग्णालयात महाबळेश्वरमधीलच ५१ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला आहे. सातारा शहरातील गुरुवार पेठमधील ७६ वर्षीय पुरुष आणि कोरेगाव तालुक्यातील गिगेवाडी येथील ६४ वर्षीय पुरुष अशा पाच कोरोना बाधितांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 

 

 

Web Title: The number of corona cases is over 8,000, with 392 new cases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.