कोरोनाबाधितांचा आकडा दोनशेच्या खाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:43 AM2021-09-26T04:43:08+5:302021-09-26T04:43:08+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, ही बाब प्रशासनासह नागरिकांना दिलासा देणारी आहे. गेल्या काही ...
सातारा : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली असून, ही बाब प्रशासनासह नागरिकांना दिलासा देणारी आहे. गेल्या काही दिवसांपासून बाधितांचा आकडा दोनशेच्या वर होता. तो आता खाली असून, शनिवारी कोरोनाचे नवे १७८ रुग्ण आढळून आले तर दिवसभरात तब्बल १२२ जणांना घरी सोडण्यात आले.
जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून कोरोनाचे रुग्ण कमी होण्याऐवजी वाढतच होते. मात्र, सप्टेंबरच्या अखेरीस रुग्णसंख्या कमी होऊ लागलेय. विशेष म्हणजे एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू होत नाही. ही बाब तर मोठी दिलासा देणारी आहे. तालुकानिहाय कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे- जावळी ०, कऱ्हाड १३, खंडाळा ३, खटाव ११, कोरेगाव ११, माण १४, महाबळेश्वर ७, पाटण ४, फलटण ५९, सातारा ४५, वाई २ व इतर ९ जणांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत २ लाख ४७ हजार जण बाधित आढळून आले असून, तब्बल ६ हजार ८१ जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. तसेच कोरोनामुक्तीचेही प्रमाण चांगले असून, आत्तापर्यंत २ लाख ३८ हजार २३ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या ५ हजार ८४५ कोरोनाबाधितांवर विविध ठिकाणी उपचार सुरू आहेत.