सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या १८; मृत ३२ वर्षीय युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:56 AM2020-04-23T10:56:51+5:302020-04-23T11:00:03+5:30
दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४७ संशयित नव्याने दाखल झाले आहेत. तसेच कºहाडमधील मृत झालेल्या युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, सध्या कोरोना बाधितांची संख्या सतरावर पोहोचली आहे.
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखीनच घट्ट होत असल्याचे दिसून येत असून कोरोना बाधितांची संख्या आता १८ वर पोहोचली आहे. हा कोरोना बाधित रुग्ण जावळी तालुक्यातील म्हातेमुरा येथील असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
दरम्यान, क-हाडमध्ये दोन दिवसांपूर्वी कोरोना संशयित म्हणून दाखल केलेल्या पाच महिन्यांच्या बालकाचा बुधवारी सायंकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या बालकाचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. दरम्यान, जिल्ह्यात आणखी ४७ संशयित नव्याने दाखल झाले आहेत. तसेच कºहाडमधील मृत झालेल्या युवकासह २३ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून, सध्या कोरोना बाधितांची संख्या सतरावर पोहोचली आहे.
कोरोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासित म्हणून तीन वर्षीय बालकाला तीन दिवसांपूर्वी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या बालकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हा मुलगा कोरोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. तसेच विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा १४ दिवसांनंतरचा अहवालही पॉझिटिव्ह आहे. दरम्यान, कºहाडामधील कृष्णा मेडिकेल कॉलेजमध्ये कोरोना संशयित म्हणून पाच महिन्याच्या बालकाला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या बालकाच्या घशाचा स्वॅप पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, त्याचा रिपोर्ट येण्यापूर्वीच बालकाचा दुर्देवी मृत्यू झाला.
जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये बुधवारी श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसगार्मुळे १, तसेच आरोग्य कर्मचाºयासह ६ तर बाहेरील जिल्ह्यातून प्रवास करुन आलेल्या २ व सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित ९ तर कºहाडमधील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे श्वसन संस्थेच्या तीव्र जंतु संसगार्मुळे ४, सध्या दाखल असलेल्या बाधित रुग्णाचे निकट सहवासित २४ व उपजिल्हा जिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाचा निकट सहवासित १ अशा एकूण ४७ जणांना अनुमानित म्हणून बुधवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या ४७ अनुमानितांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पुणे येथील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 20 एप्रिल रोजी मृत्यु झालेल्या 32 वर्षीय पुरुषाचा नमुना तपासणीसाठी पाठविण्यात आला होता, त्याचा अहवाल निगेटिवह आला आहे तसेच क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील १७, कृष्णा मेडिकल येथील 5 व उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 1 अशा एकूण २३ अनुमानितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
सध्या १३ बाधितांवर उपचार सुरू ...
जिल्ह्यात आत्तापर्यंत १८ कोरोना बाधित असून यापैकी दोघांचा मृत्यू झाला तर तीनजण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे सध्या १३ कोरोना बाधितांवर विविध ठिकाणी विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.