सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:27 AM2021-07-10T04:27:27+5:302021-07-10T04:27:27+5:30

सातारा जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव गत दोन वर्षांत ‌वाढलेला आहे. आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार ५२५ जणांची ...

The number of corona victims in Satara district has crossed 2 lakh | सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख पार

सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या २ लाख पार

Next

सातारा

जिल्ह्यात शहरासोबतच ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रभाव गत दोन वर्षांत ‌वाढलेला आहे. आत्तापर्यंत ११ लाख ५५ हजार ५२५ जणांची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी २ लाख १ हजार ६६६ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले आहे. तर १ लाख ८८ हजार ५१ लोक बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर ४ हजार ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. २३ मार्च २०२० रोजी जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाची साखळी शोधून ती खंडित करण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला होता. पण, नंतरच्या काळात नेमकी बाधा कोणापासून झाली, हेच समजून येणे अवघड झाले. दुसरी लाट येणार याची शक्यता होती. पण, येईलच याची खात्री नव्हती. त्यामुळे काही प्रमाणात मोकळीक देण्यात आली. यामुळे कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला. तोपर्यंत जिल्ह्यातील कोविड सेंटर बंद करण्यात आली होती. त्यामुळे लोकांवर उपचारास वेळ लागू लागल्याने मृत्यूचे प्रमाण वाढले. यामुळे लोक अधिक भयभीत झाले. त्यातच प्रशासनाने विलगीकरण कक्षात लोकांना न ठेवता होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे घरातील इतर लोकांनाही बाधा होऊन दुसऱ्या टप्प्यात बाधित होणाऱ्या लोकांचे प्रमाण अधिक वाढले. ही संख्या आता २ लाखांच्या पार गेली आहे.

जिल्ह्यातील बाधितांची संख्या

सातारा - ४१९५०

कराड - ३०३७९

फलटण - २९००४

खटाव - २०२७५

कोरेगाव - १७५५३

माण - १३५५५

वाई - १३१९३

खंडाळा - १२१५१

पाटण - ८९४८

जावली - ८८३३

महाबळेश्वर - ४३६९

इतर - १४५०

चौकट

कोरोनामुळे आत्तापर्यंत ४ हजार ८६८ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये सातारा तालुक्यातील १२४६, कराडमधील ९०६, फलटण ४७७, माण २८४, जावली १८३, खंडाळा १५४, खटाव ४७५, पाटण ३०१, वाई ३०४, कोरेगाव ३८३ आणि महाबळेश्वर तालुक्यातील ८४ जणांचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातील ७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Web Title: The number of corona victims in Satara district has crossed 2 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.