सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७९ वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2020 01:29 PM2020-05-04T13:29:10+5:302020-05-04T13:31:13+5:30
सातारा जिल्ह्याने रेडझोनमध्ये प्रवेश केल्यापासून रोज एक तरी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. एकही दिवस असा नाही की, कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी जावळी तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. मात्र, आता जावळीतील रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत
सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असून सोमवारी आणखी दोघांचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ७९ वर पोहोचली आहे. हे नवीन दोन रुग्ण क-हाडमधील आहेत. तर १७१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. सातारा जिल्ह्याने रेडझोनमध्ये प्रवेश केल्यापासून रोज एक तरी कोरोना बाधित रुग्ण आढळून येत आहे. एकही दिवस असा नाही की, कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. यापूर्वी जावळी तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्ण सापडत होते. मात्र, आता जावळीतील रुग्ण बरे होऊन घरी जाऊ लागले आहेत.
सध्या या ठिकाणी नवा बाधित रुग्ण सापडला नाही. परंतु सातारा शहर आणि कºहाड ही दोन मुख्य शहरे आता कोरोनाचे हॉटस्पॉट बनत चालली आहेत. पुण्याहून ४६ आरोपींना साता-यात आणण्यात आल्यानंतर यातील चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे आले. त्यामुळे साताºयातील कोरोना बाधितांचा आकडा वाढत चाललाय तर क-हाडमध्येहीच हीच परिस्थिती आहे. सोमवारी कºहाड तालुक्यामध्ये दोघांना कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात या दोन बाधितांवर उपचार सुरू आहेत.