धोकादायक घरांची संख्या अर्धशतकाकडे : रहिमतपूर पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2019 01:18 AM2019-06-06T01:18:21+5:302019-06-06T01:18:35+5:30

रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी धोकादायक घरांचा आकडा अर्धशतकाकडे गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी २५ इमारती धोकादायक होत्या. त्यामध्ये वाढ होऊन गतवर्षी

 Number of Dangerous Homes in Half Years: Survival of Rahimatpur Municipal Corporation | धोकादायक घरांची संख्या अर्धशतकाकडे : रहिमतपूर पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे सुरू

धोकादायक घरांची संख्या अर्धशतकाकडे : रहिमतपूर पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व्हे सुरू

googlenewsNext
ठळक मुद्दे दोन वर्षांत घरांच्या संख्येत वाढ

जयदीप जाधव ।
रहिमतपूर : रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील धोकादायक इमारतींच्या संख्येत दरवर्षी झपाट्याने वाढ होत आहे. यंदाच्या वर्षी धोकादायक घरांचा आकडा अर्धशतकाकडे गेला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी २५ इमारती धोकादायक होत्या. त्यामध्ये वाढ होऊन गतवर्षी ३८ इमारती धोकादायक ठरवून संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. दरम्यान, रहिमतपूर पालिकेकडून पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर धोकादायक घरांचा सर्व्हे सुरू आहे.

रहिमतपूर नगरपरिषद हद्दीतील मोडकळीस आलेली घरे पावसाळ्यात पडल्यास घरात राहणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. संभावित होणारी दुर्घटना व नुकसान टाळण्यासाठी पालिका प्रशासनाने धोकादायक असलेल्या इमारतीचा सर्व्हे सुरू केला आहे. गतवर्षी ३८ इमारती धोकादायक ठरवून संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. धोकादायक घरात वास्तव्य करणाºया मिळकतदारांना नोटिसा बजावून पर्यायी ठिकाणी स्थलांतर करण्याची सूचना केली होती.

पावसामुळे दुर्घटना घडल्यास संभावित नुकसानीला मिळकतदार जबाबदार राहतील. त्यामुळे मिळकतदारांनी पर्यायी जागेत तत्काळ स्थलांतर करावे, अशी सूचना मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी दिल्या होत्या.
दरम्यान, बहुतांशी मिळकतदारांना पर्यायी निवासस्थान उपलब्ध नसल्यामुळे नाईलाजाने धोका पत्करून धोकादायक घरातच कुटुंबीयांसह वास्तव्य करावे लागत असल्याचे सर्व्हेदरम्यान दिसून येत आहे.

पावसाळ्यात शेजाऱ्यांनाही धोका
धोकादायक घरात राहणाºया बहुतांशी मिळकतदारांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना घरासाठी पर्यायी जागा उपलब्ध नाही, काहींची आर्थिक परिस्थिती नाही, काहींच्या डोक्यावर कर्जाचे ओझे आहे. त्यामुळे नाईलाजाने अनेक मिळकतदार धोका पत्करून धोकादायक घरात राहत आहेत. त्यांच्याबरोबरच धोकादायक घराशेजारी राहणाºया नागरिकांनाही पावसाळ्यात धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यामध्ये धोकादायक घरांची रात्री-अपरात्री पडझड झाल्यास त्याचा फटका शेजारी राहणाºयांना बसणार आहे. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने धोकादायक घराबाबत ठोस भूमिका घेणे गरजेचे बनले आहे.


रहिमतपूर, ता. कोरेगाव येथील शहरात धोकादायक इमारत धोक्याची घंटा ठरत आहेत.

 

Web Title:  Number of Dangerous Homes in Half Years: Survival of Rahimatpur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.