बाधितांचा आकडा ५५ हजारांच्या उंबरठ्यावर..
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:55 AM2021-01-02T04:55:02+5:302021-01-02T04:55:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळू-हळू वाढतच असून गुरुवारी नवीन ७० बाधितांची नोंद झाली. त्यामुळे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हळू-हळू वाढतच असून गुरुवारी नवीन ७० बाधितांची नोंद झाली. त्यामुळे रुग्णांचा आकडा ५४ हजार ९०१ वर गेला तर दिवसभरात एकाही मृताची नोंद झाली नाही. दरम्यान, ८७ जणांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत ५२ हजार ५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत.
जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री जाहीर केलेल्या अहवालानुसार ७५ जण बाधित आले. त्यामध्ये सातारा शहराबरोबरच तालुक्यातील पाटखळ, जिहे, अतित, आसनगाव, नुने येथे तर कऱ्हाड तालुक्यातील विद्यानगर, कोयना वसाहत येथे नवीन रुग्ण आढळले. फलटण तालुक्यातील कोळकी, चव्हाणवाडी, साखरवाडी, मुरुम तसेच खटाव तालुक्यात वडूज, खटाव, अंबवडे, निमसोड येथे बाधित आढळून आले आहेत.
माण तालुक्यातील वरकुटे मलवडी, म्हसवड, मार्डी, दहिवडी, गोंदवले बुद्रुक तर कोरेगाव तालुक्यातील एकसळ, वाठार किरोली, दुघी, रहिमतपूर आदी ठिकाणी नवीन रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर वाई, जावळी, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांतही नवीन रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सहाव्या दिवशीही मृताची नोंद झाली नाही. आतापर्यंत १ हजार ७९१ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
चौकट :
३८७ जणांचे नमुने तपासणीला...
गुरुवारी दिवसभरात ३८७ संशयितांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयातील ११, कऱ्हाड ५०, फलटण ६, कोरेगाव ९, वाई येथील ४५, रायगाव १९, पानमळेवाडी ८५, महाबळेश्वरमधील १०, दहिवडी १९, म्हसवड १३, पिंपोडे ७ आणि कृष्णा मेडिकल कॉलेजमधील ५३ जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
..................................................