अपघाती मृतांमध्ये युवकांची संख्या धक्कादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 04:44 AM2021-08-13T04:44:40+5:302021-08-13T04:44:40+5:30

कऱ्हाड : वाहनचालक वेगमर्यादा ओलांडतात. काहीवेळा निष्काळजीपणाही दाखवितात. त्यामुळे अमर्याद वेग आणि निष्काळजीपणा अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. कऱ्हाड शहर ...

The number of youths among the accidental deaths is shocking | अपघाती मृतांमध्ये युवकांची संख्या धक्कादायक

अपघाती मृतांमध्ये युवकांची संख्या धक्कादायक

Next

कऱ्हाड : वाहनचालक वेगमर्यादा ओलांडतात. काहीवेळा निष्काळजीपणाही दाखवितात. त्यामुळे अमर्याद वेग आणि निष्काळजीपणा अपघाताला निमंत्रण देणारा ठरतो. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत सहा वर्षांत असे ४६२ अपघात झाले आहेत. त्यामध्ये २३५ जणांनी आपला जीव गमावला असून अपघाती मृतांमध्ये युवकांची संख्या जास्त आहे.

राष्ट्रीय महामार्गासह राज्य आणि जिल्हा मार्गांवरही वाहनांचा वेग अमर्याद असतो. जोपर्यंत अडथळा येत नाही तोपर्यंत चालक ‘अ‍ॅक्सिलेटर’वरून पाय काढत नाहीत आणि ज्यावेळी तो सावध होतो त्यावेळी वेळ निघून गेलेली असते. चालकासह प्रवाशांनाही अपघाताचा सामना करावा लागतो. कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत सहा वर्षांमध्ये असे अनेक अपघात झाले आहेत. त्यामध्ये वाढलेला वेग आणि चालकांचा निष्काळजीपणा बहुतांश अपघातांना कारणीभूत ठरल्याचे दिसून येते.

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुणे-बंगलोर आणि गुहाघर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गांसह काही राज्य व जिल्हा मार्गही आहेत. या मार्गांवर दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. बहुतांश रस्ते चौपदरी आणि चकाचक असल्यामुळे चालक भरधाव वेगात वाहने चालवितात. परिणामी, अपघातांचे प्रमाण वाढत आहे. आणि या अपघातांमधील मृतांची संख्याही चिंताजनक आहे. आजअखेर गत सहा वर्षांत झालेल्या अपघातांचा विचार करता २३५ अपघात जीवघेणे ठरले असून या अपघातातील मृतांमध्ये युवकांची संख्या तुलनेने जास्त असल्याचे दिसते.

- चौकट

अपघाती मृतांमध्ये...

२० ते ३५ वर्षीय : ५२ टक्के

३६ ते ५० वर्षीय : ३३ टक्के

५१ ते ७० वर्षीय : १५ टक्के

- चौकट

कऱ्हाडच्या हद्दीतील अपघात

२०१४ : १२५

२०१५ : ४३

२०१६ : ७६

२०१७ : ६१

२०१८ : ५४

२०१९ : ४१

२०२० : ४४

२०२१ : १८

(२०२१ जूनअखेर)

- चौकट

का होतात अपघात..?

१) अप्रशिक्षित वाहनचालक

२) चालकाचा अती आत्मविश्वास

२) मद्यप्राशन केलेला चालक

३) इंडिकेटर न लावणे

४) चुकीच्या पद्धतीने ‘ओव्हरटेक’

५) असुरक्षितरीत्या वाहन पार्किंग

७)रिफ्लेक्टर, रेडिअम, टेललाईट नसणे़

- चौकट

२३५ अपघात प्राणघातक

कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गत सहा वर्षांत झालेल्या एकूण अपघातांपैकी २३५ अपघात प्राणघातक ठरले आहेत. त्यामध्ये प्रवाशांचा मृत्यू झाला असून वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

- चौकट

अपघात सरासरी

जीवघेणे : ३८ टक्के

गंभीर जखमी : २४ टक्के

किरकोळ जखमी : १८ टक्के

जखमीशिवाय : २० टक्के

- चौकट

१८० गंभीर जखमी

सहा वर्षांतील अपघातांमध्ये १८० जण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारानंतर त्यापैकी अनेकजण पूर्ववत झाले. मात्र, काहीजण आयुष्यभरासाठी जायबंदी झाल्याचे दिसून येते.

फोटो : १२केआरडी०३

कॅप्शन : प्रतिकात्मक

Web Title: The number of youths among the accidental deaths is shocking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.