साताऱ्यातील कॅफेत अश्लील कृत्य; नऊ जणांवर गुन्हा
By नितीन काळेल | Published: April 19, 2024 01:00 PM2024-04-19T13:00:11+5:302024-04-19T13:00:35+5:30
पोलिसांचा तीन ठिाकणी छापा : रजिस्टर नोंदणीही नाही
सातारा : सातारा शहर पोलिसांनी शहरातील तीन कॅफेमध्ये छापा टाकून कारवाई केली. यामध्ये अश्लील कृत्य, रजिस्टरमध्ये नोंद न ठेवणे याप्रकरणी एकूण नऊ जणांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहर पोलिसांनी बुधवारी सायंकाळनंतर शहरातील तीन कॅफेमध्ये छापा टाकत कारवाई केली. सेव्हन स्टार काॅम्प्लेक्स याठिकाणच्या दोन तर विसावा नाका परिसरातील एका कॅफेवर ही कारवाई झाली. याप्रकरणी शहर ठाण्यातील पोलिसांनी तक्रार दिली आहे.
त्यानुसार यश किरण निकम (रा. शिवथर, ता. सातारा), जयदीप नलवडे (पूर्ण नाव नाही, रा. वाढे, ता. सातारा), वैभव जोतीराम साळुंखे (रा. कामाठीपुरा, सातारा), संग्राम हरिचंद्र दणाणे (रा. गुरुवार पेठ, सातारा) तसेच गणेश सतीश जाधव (रा. व्यंकटपुरा पेठ, सातारा), मानतेश मारुती जानी (रा. कोयना सोसायटी, सातारा) यांच्यासह इतर तीन महिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
कॅफेमध्ये पूर्ण बैठक व्यवस्था सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेपासून दूर ठेवणे, दरवाजे अपारदर्श ठेवून अंधार करणे, येणाऱ्या-जाणाऱ्या व्यक्तींची नोंदणी रजिस्टरमध्ये न करणे, सार्वजनिक कॅफेमध्ये अश्लील कृत्य करण्यास अप्रेरणा देणे याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सातारा शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिस अधिक माहिती घेत आहेत.