भर पावसात खांद्यावर ‘अंधाराचं ओझं’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 09:13 PM2017-07-29T21:13:04+5:302017-07-29T21:15:34+5:30

सातारा : कोयना धरणाच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या जावळी तालुक्यातील कांदाटी खोºयात आजही स्थानिक भूमिपूत्रांना आदिवासींसारखे जीवन जगावे लागत आहे.

'Odds of darkness' on the shoulder. rain | भर पावसात खांद्यावर ‘अंधाराचं ओझं’

भर पावसात खांद्यावर ‘अंधाराचं ओझं’

Next
ठळक मुद्देजावळी तालुक्यातील कांदाटी खोºयामध्ये खांब पडल्याने वीजपुरवठा खंडित‘एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सहकार्याची भूमिकाउध्द्वस्त झालेल्या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंदसाधारणपणे आठ ते दहा माणसे खांब नेण्यासाठी लागतात

सातारा : कोयना धरणाच्या निर्मितीमुळे विस्थापित झालेल्या जावळी तालुक्यातील कांदाटी खोºयात आजही स्थानिक भूमिपूत्रांना आदिवासींसारखे जीवन जगावे लागत आहे. अतिवृष्टी व वादळवाºयांमुळे डोंगरपठारावरील तीन विद्युत खांब पडल्याने १५ दिवस त्या भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. सध्या लोकांचे हाल सुरू झाले आहेत.
         दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांच्या सहकार्याने भर पावसात, चिखलात याठिकाणी नवीन विद्युत पोल बसविण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.
जावळी तालुक्यातील कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयामुळे वाघावळे, उचाट, कांदाट, सालोशी, मोरणी, महाळुंगे, शिंदी वलवल, चकदेव, आकल्पे, निवळी, लामज या ६ हजार लोकवस्ती असलेल्या भागात गेले पंधरा दिवस विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे जिवनावश्यक असणारी पिठाची गिरण व मोबाईल चार्जिंग पूर्णपणे बंद झाले आहेत. त्यामुळे सध्या अनेक घरात भात-आमटी व्यतिरिक्त कोणतेही खाद्य बनवता येत नाही.  

        नैसर्गिकरित्या डोंगरपठारावरुन पाणी येत असल्यामुळे लोकांना दिलासा मिळाला आहे. हे खांब घेवून जाण्यासाठी कोणत्याही यंत्रणेचा वापर न करता कर्मचारी व ग्रामस्थ निसरड्या वाटेने हे लोखंडी खांब खांद्यावरुन झोळी करुन घेवून जात आहेत.
सध्या पावसाळ्यामुळे या भागातील प्राथमिक शाळेला सुट्टी आहे. १५ आॅगस्टला नियमितपणे शाळा सुरु होणार आहे. तत्पूर्वी विद्युत पुरवठा व शिंदी ते लामज, लामज ते आकल्पे हा वाहून गेलेला व उध्द्वस्त झालेल्या रस्त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.

जिल्हा परिषद सदस्या प्रणिता जंगम, राजाराम मोरे, सीताराम जंगम, काशिनाथ पाटील, आर. आर. चव्हाण, वाघावळे सरपंच सदाशिव जंगम, सुभाष मोरे, काशिनाथ कदम, यशवंत सावंत हे ग्रामस्थ वीज कर्मचाºयांना सहकार्य करीत आहेत.
या भागातील व बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे मूळगाव दरे तर्फ खांब आहे. तेसुद्धा येथील विकासकामांबाबत सातत्याने संपर्क ठेवून आहेत.

विजेच्या पोलचे वजन ७०० किलो...
जावळी तालुक्यातील कांदाटी खोरे हा दुर्गम भाग आहे. या भागात पाऊस आणि वारे अधिक असते. त्यामुळे अशा भागात लोखंडी खांबच उपयुक्त ठरतात. कारण, सिमेंटच्या खांबापेक्षा याचे वन कमी असते. साधारणपणे खांब दोन प्रकारच्या वाहिन्यांसाठी वापरण्यात येतात. कमी दाबाच्या वाहिनीसाठी ७०० किलो आणि ८ मिटरचा तर उच्च दाबाच्या वाहिनीसाठी ९०० किलो वजन आणि ९ मिटरचा खांब वापरला जातो. हे पोल नेणे सहज शक्य होते. साधारणपणे आठ ते दहा माणसे खांब नेण्यासाठी लागतात. सध्या डोंगर पठारावर खांब घेऊन जाण्यासाठी ‘एकमेकां साह्य करु, अवघे धरु सुपंथ’ या उक्तीप्रमाणे सहकार्याची भूमिका घेतली जात आहे.

 

Web Title: 'Odds of darkness' on the shoulder. rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.