मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी प्राध्यापकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 18:11 IST2019-05-24T18:10:04+5:302019-05-24T18:11:52+5:30
मतमोजणीचे कर्तव्य न करता मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात एका सहायक प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला आहे.

मतमोजणी केंद्रावर गोंधळ घातल्याप्रकरणी प्राध्यापकावर गुन्हा
सातारा : मतमोजणीचे कर्तव्य न करता मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याच्या आरोपावरून शहर पोलीस ठाण्यात एका सहायक प्राध्यापकावर गुन्हा दाखल झाला आहे.
संतोष गोविंद सायकर (रा. कोरेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या सहायक प्राध्यपकांचे नाव आहे. खंडाळ्याचे तहसीलदार दशरथ ज्ञानेश्वर काळे (वय ४५, रा.) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये गुरुवारी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होती.
टेबल क्रमांक १९ जवळ वाई विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सुरू असताना सहायक प्राध्यापक संतोष सायकर यांनी मोठमोठ्याने ओरडून गोंधळ घालण्यास सुरूवात केली. त्यांना समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मोठ्या आवाजात गुर्मीची भाषा बोलून त्यांनी गोंधळ घातला. तसेच मतमोजणीचे कर्तव्य न करता कामकाजामध्ये अडथळाही निर्माण केला. याबाबत अधिक तपास हवालदार शेवाळे हे करत आहेत.