अधिकाऱ्यांची तारांबळ, नागरिकांचा गोंधळ

By admin | Published: February 2, 2015 09:45 PM2015-02-02T21:45:02+5:302015-02-02T23:59:02+5:30

कऱ्हाड तहसील कार्यालय : स्थलांतरित जागेतील पहिला दिवस

Officers' Colleagues, Citizens Confusion | अधिकाऱ्यांची तारांबळ, नागरिकांचा गोंधळ

अधिकाऱ्यांची तारांबळ, नागरिकांचा गोंधळ

Next

कऱ्हाड : कऱ्हाड तहसील कार्यालयाचे कामकाज सोमवारी पर्यायी जागेत सुरू झाले़ जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सोमवारी सुरुवात झाली खरी; पण विस्कळीत साहित्य, अधिकाऱ्यांची तारांबळ अन् नागरिकांचा गोंधळ, अशी स्थिती पहिल्या दिवशी पाहावयास मिळाली़ गेल्या दोन-तीन दिवसांपासून तहसील कार्यालयाच्या जुन्या इमारतीमधून साहित्य हलविण्यास सुरुवात झाली़ आजही कर्मचारी जुन्या आणि नव्या कार्यालयादरम्यान हेलपाटे मारताना दिसत होती़ नवीन ठिकाणी पूर्वीच्या अप्पर जिल्हा सत्र न्यायालय विभागात महसूल शाखा, सहायक अधीक्षक (वित्त) विभागात पुरवठा शाखा व उपकोषागार कार्यालय, अधीक्षक (प्रशासकीय) खोलीत निवडणूक शाखा, चेंबर खोलीत दुय्यम निबंधक कार्यालय, अधीक्षक कक्षेत संजय गांधी शाखा, वकील कक्षेत कार्यालयीन अभिलेख व बारनिशी शाखा, दिवाणी स्तर शाखेत तहसीलदार कक्ष, व्ही. सी. रूम आणि संगणकीयकृत सातबारा व रोजगार हमी योजना शाखा आदी शाखांची विभागवार मांडणी करण्यात आली आहे.जिल्हा सत्र न्यायालयाच्या जुन्या इमारतीत सुविधांची कमतरता असल्याने याचा त्रास अधिकाऱ्यांना तर होतोच आहे; पण नागरिकांचीही यातून सुटका नाही़ महसूल विभागासह इतर कार्यालयातील फायली, महत्त्वाचे साहित्य व कागदपत्रांची गाठोडी ठेवण्यासाठी कपाटे व साधनसामुग्री तेथे उपलब्ध नाही. ना टेबल ना खुर्च्या, ना सामान्य जनतेची बैठक व्यवस्था अशा प्रकारच्या गैरसोयींचा अनुभव तेथे कामासाठी येणाऱ्या नागरिकांना येत आहे़ येथे पिण्याच्या पाण्याची, विजेची व्यवस्थाही ठीक नाही़ त्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते़ अस्वच्छ परिसर, सुविधा नसलेले स्वच्छतागृह अशा विविध अडचणी या ठिकाणी असताना कोणत्याही नियोजनाशिवाय व पूर्वतयारीअभावी कार्यालय हलविण्यात आल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे़ सर्वसामान्य जनता कामानिमित्त येथे येत आहे. मात्र, अस्ताव्यस्त साहित्य व महत्त्वाचे विभाग कोणत्या खोलीत आहेत. याची माहितीही मिळत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Officers' Colleagues, Citizens Confusion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.