अधिकारी पदाधिकाºयांचे ऐकत नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2017 05:25 PM2017-10-03T17:25:58+5:302017-10-03T17:31:18+5:30
फलटण : फलटण नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी हे नगरसेवक, पदाधिकारी यांची कामे, सूचना ऐकत नसल्याच्या आरोपावरून नगरपालिका विशेष सभा गाजली तर या सभेत दोन विषय तहकूब करून ३७ विषयाना मंजुरी देण्यात आली.
फलटण : फलटण नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी हे नगरसेवक, पदाधिकारी यांची कामे, सूचना ऐकत नसल्याच्या आरोपावरून नगरपालिका विशेष सभा गाजली तर या सभेत दोन विषय तहकूब करून ३७ विषयाना मंजुरी देण्यात आली.
फलटण नगरपालिकेची सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा नीता नेवसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सभा सुरू होताच विरोधकांनी मागील सभेतील सभेच्या कामकाजाचे व्हिडिओ शुटिंग मागितले, त्याशिवाय सभा सुरू करायची नाही, असा मुद्दा विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक-निंबाळकर, सचिन अहिवळे यांनी मांडला. यावर कोणीच अधिकारी बोलत नसल्याने यावरून जोरदार वाद-विवाद सुरू झाले.
विरोधकांचे अधिकारी कर्मचारी सूचना, कामे ऐकत नसल्याचा आरोप त्यांनी केल्यावर सत्ताधारी गटातूनही तेच आरोप झाले. सत्ताधारी गटाचे गटनेते रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनीही प्रशासनाच्या कारभारावर जोरदार हल्ला चढविला. मुख्याधिकारी लक्ष देत नाहीत, त्यांचा कर्मचाºयांवर अंकुश नसल्याचा आरोप रघुनाथराजेंनी केला.
नगरपालिकेतील विविध विभागांच्या अधिकाºयांच्या खुर्च्यांवर ठेकेदार खुशाल बसत असतात, याचे सीसीटीव्ही फुटेज आहेत. असा आरोप समशेरसिंह यांनी केल्यावर बराच गोंधळ उडाला. रघुनाथराजेंनीही मुख्याधिकारी यांना धारेवर धरल्यावर मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांनी पुन्हा असा प्रकार होणार नाही, सदस्यांच्या सूचनेची दखल घेऊ, अशी ग्वाही दिल्यावर सर्वजण शांत झाले.
नगरपालिका हद्दीतील महतपुरा पेठेतील सर्व्हे नंबर २ ब/३१ या जागेमधून सर्व्हे नं १०० आणि १०२ या मिळकतधारकांना ये-जा करण्यासाठी रस्ता संपादन करण्याच्या ठरावावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. राज्यशासनाने हा ठराव यापूर्वीच रद्द केला आहे. या जागेशेजारी दुसरा पर्यायी रस्ता असून, तेथील अतिक्रमणे काढावीत आणि रास्ता करावा, अशी मागणी विरोधकांनी केली.
यावर रघुनाथराजे यांनी आक्षेप घेत ठराव मंजूर करावा, अशी मागणी केली. यावर सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाल्याने शेवटी ठराव मतदानाला टाकण्यात आला. सत्ताधारी गटाने मतदानाद्वारे हा ठराव मंजूर केला.
शहरामध्ये विविध ठिकाणी पे-एंड पार्किंग व्यवस्था करणे, शहरामध्ये पे-एंड यूज शौचालय बांधणे, रंगरंगोटी करणे, नगरपालिका इमारतीबाहेर सीसीटीव्ही कैमरे बसविणे, नगरपालिका कार्यालयात वातानुकूलित यंत्रणा बसविणे, आदी विषयाना मंजुरी देण्यात आली आहे.