‘माळीण’च्या धास्तीने अधिकाऱ्यांची धावाधाव

By Admin | Published: June 26, 2015 09:51 PM2015-06-26T21:51:57+5:302015-06-26T21:51:57+5:30

बोंडारवाडीची पाहणी : ठेकेदाराची झाडाझडती; दोन दिवसांत उपाययोजना करण्याच्या सूचना--लोकमतचा प्रभाव

Officers' scare of 'Malin' | ‘माळीण’च्या धास्तीने अधिकाऱ्यांची धावाधाव

‘माळीण’च्या धास्तीने अधिकाऱ्यांची धावाधाव

googlenewsNext

परळी : गेल्या चार-पाच दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परळी खोऱ्यातील बोंडारवाडी येथे माळीणसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ठेकेदाराच्या मनमानीपणामुळे ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप झाला होता. यासंदर्भात लोकमतध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तहसीलदारांसह तलाठ्यापर्यंत सर्वच अधिकाऱ्यांनी बोंडारवाडीकडे धाव घेतली. लवकरात लवकर या ठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.तहसीलदार राजेश चव्हाण यांच्यासह अधिकाऱ्यांनी बोंडारवाडीकडे धाव घेत ग्रामस्थांना दिलासा दिला. मात्र, ज्या ठेकेदाराच्या प्रतापामुळे चिखलसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याला दोन दिवसांत रस्ता दुरुस्त करण्याची सूचना देऊन झाडाझडती घेण्यात आली.बोंडारवाडी येथील २०० मीटरचा रस्ता व भराव वाहून गेल्याने गावच दलदलीत फसले होते. ग्रामस्थांच्या घरावर, अंगणामध्ये गुडगाभर चिखल साचला होता. यावर या गावावर माळीणसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी प्रयत्न करून चिखल कमी केला. यासंदर्भात ‘लोकमत’ने प्रकाशझोत टाकल्यानंतर प्रशासनाच्या हा प्रकार निदर्शनास आला.यावर मंगळवारी सकाळी तहसीलदार राजेश चव्हाण, पंचायत समिती सभापती कविता चव्हाण, गटविकास अधिकारी सचिन घाडगे, परळी मंडलाधिकारी संजय बेलकर यांच्यासह तलाठी, ग्रामसेवकांनी बोंडारवाडीस भेट देऊन पूर्ण परिस्थितीची पाहणी केली. या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराची तहसीलदार चव्हाण यांनी माहिती घेतली. त्यावेळी ग्रामस्थांनी ठेकेदाराच्या तक्रारीचा पाढाच वाचला. (वार्ताहर)

कुस बुदु्रकचीही हीच परिस्थिती
परळी खोऱ्यातील कुस बुदु्रक येथे काही ठिकाणी जमीन खचली असून, डोंगरातील मातीचा भरावही खाली आला आहे. याचे वृत्त समजताच प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी येथील घटनेची पाहणी करत त्यावरील उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Officers' scare of 'Malin'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.