उच्चपदस्थ अधिकारी रमले पुस्तकांच्या गावा!, सातारच्या 'भिलार'ची राज्यातील अधिकाऱ्यांना भुरळ

By प्रगती पाटील | Published: December 7, 2023 12:34 PM2023-12-07T12:34:04+5:302023-12-07T12:34:26+5:30

सातारा : नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निबंधक आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ ...

officials enjoyed the village of books, Satara Bhilar attracted the officials of the state | उच्चपदस्थ अधिकारी रमले पुस्तकांच्या गावा!, सातारच्या 'भिलार'ची राज्यातील अधिकाऱ्यांना भुरळ

उच्चपदस्थ अधिकारी रमले पुस्तकांच्या गावा!, सातारच्या 'भिलार'ची राज्यातील अधिकाऱ्यांना भुरळ

सातारा : नोंदणी महानिरीक्षक विभागाचे (आयजीआर) राज्यातील १४ मुद्रांक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निबंधक आणि शालेय शिक्षण विभागाचे राज्यातील १७ शिक्षण उपसंचालक यांना पुस्तकाच्या गावाने अक्षरशः भुरळ घातली. हे उच्चपदस्थ अधिकारी दिवसभर या गावी रमले.

महाबळेश्वर तालुक्यातील भिलार २०१७ पासून पुस्तकाचे गाव म्हणून राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाने घोषित केले आहे. हे भारतातील पहिले पुस्तकांचे गाव असून शासनाचा पुढाकार आणि गावाचा सहभाग याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. येथे बालसाहित्य, स्पर्धा परीक्षा, कादंबरी, कविता, मराठी भाषा व संस्कृती, विज्ञान नियतकालिके, चरित्रे, इतिहास, स्री साहित्य, कथा, लोकसाहित्य, परिवर्तन चळवळ आदि ३५ साहित्य प्रकारानुसार घरे, लॉजेस शाळा व मंदिरामध्ये वाचनासाठी पुस्तके विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

पुणे येथील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) या राज्य शासनाच्या शिखर संस्थेत या अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. सत्रसंचालिका म्हणून डॉ. अनिता महिरास व अक्षय बनसोडे काम पाहत आहेत. नोंदणी महानिरीक्षक विभागातील गजानन वाखडे, के. आर. दवंगे, विजय भालेराव, किशोरकुमार मगर, हेमलता जगताप, संतोष हिंगाणे, गोविंद गीते, श्रीकांत सोनवणे, के. एस. कांबळे, सुनील पाटील, अशोक आटोळे, आर. जी. जानकर, आर. टी. नाईक,

प्रकाश खोमणे आणि शालेय शिक्षण विभागातील श्रीराम पानझाडे, हारून आतार, वंदना वाहूळ, राजेश क्षीरसागर, रमाकांत काटमोरे, अनुराधा ओक, औदुंबर उकिरडे, डॉ. सुभाष बोरसे, वैशाली जामदार, सुधाकर तेलंग, चिंतामण वंजारी, संदीप संगवे, राजेंद्र अहिरे, अनिल साबळे, शिवलिंग पटवे, निशादेवी वाघमोडे, माधुरी सावरकर हे सर्व वर्ग एकचे अधिकारी राज्यातील विविध जिल्ह्यातून भिलार मध्ये आले होते.

हिलरेंज एज्युकेशन सोसायटीचे अध्यश नितीन भिलारे, संचालिका तेजस्विनी जतीन भिलारे, गटशिक्षणाधिकारी आनंद पळसे, महेश ननावरे, संगीता शिंदे, अर्चना गाडेकर, अमोल आंब्राले व पुस्तकाचे गाव प्रकल्प अधिकारी बालाजी हाळदे, राजेश जाधव, उमा शिंदे, संतोष भिलारे, प्रमोद पवार यांनी स्वागत करून प्रकल्पाबाबत सविस्तर माहिती दिली. दरम्यान या चमूने वाई येथील दुय्यम निबंधक कार्यालयास भेट देऊन माहिती घेतली. यावेळी विजय जगताप यांनी स्वागत केले.


सन २०१८ मध्ये साताऱ्यात झालेल्या ऐतिहासिक राज्य शिक्षक पुरस्कार सोहळ्यावेळी सर्व पुरस्कारप्राप्त शिक्षकांची भिलारला व्यवस्था केली होती, शिवाय त्यानंतर अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन भिलारला झाले होते, या दोन्ही बाबी संस्मरणीय आहेत. आमच्यातल्या अनेक सहकाऱ्यांनी सहकुटुंब पुस्तकांच्या मेजवानीस पुन्हा येण्याचा संकल्प केला आहे. -राजेश क्षीरसागर, शिक्षण उपसंचालक पुणे

Web Title: officials enjoyed the village of books, Satara Bhilar attracted the officials of the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.