अधिकाऱ्यांच्या कानी ‘टोलमुक्ती गीत’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2019 12:24 AM2019-11-27T00:24:35+5:302019-11-27T00:24:50+5:30

सातारा : महामार्गावरील असुविधा व्हिडीओ गीताच्या स्वरुपात व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर असलेले हे गीत अधिकाऱ्यांच्या कानी पडावे, यासाठी ...

Officials shout 'toll free song' | अधिकाऱ्यांच्या कानी ‘टोलमुक्ती गीत’

अधिकाऱ्यांच्या कानी ‘टोलमुक्ती गीत’

Next

सातारा : महामार्गावरील असुविधा व्हिडीओ गीताच्या स्वरुपात व्हायरल झाले आहे. सोशल मीडियावर असलेले हे गीत अधिकाऱ्यांच्या कानी पडावे, यासाठी टोलविरोधी जनता चळवळीचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. अधिकाºयांकडे जाऊन हे गीत त्यांना दाखवून महामार्ग असुविधांची तीव्रता दर्शविण्यात येत आहे.
महामार्गावरील असुविधांविरोधात आवाज उठविण्यासाठी सोशल मीडियावर ‘टोल विरोधी जनता’ या नावाने चळवळ सुरू करण्यात आली. या चळवळीने अनोख्या मार्गाने आंदोलन करत प्रशासन आणि राज्यकर्त्यांचे लक्ष वेधून घेतले.
टोल विरोधी जनता चळवळीतील कार्यकर्त्यांचा आवाज राज्यकर्त्यांसह प्रशासनापर्यंत पोहोचविण्यात ‘लोकमत’ आघाडीवर राहिला. यामुळे महामार्गावरील रस्ते दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे.
सुरक्षित महामार्ग देण्यासाठी प्रशासन कार्यरत झाल्यानंतर आता चळवळीने मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या मागणीकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. खड्डेमुक्त महामार्ग करण्याचे काम सर्वत्र सुरू झाल्यानंतर आता महामार्गावरील मूलभूत सुविधा मिळविण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.
चळवळीच्या कार्यकर्त्यांनी नुकतेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची भेट घेऊन त्यांना हे गाणे ऐकवले. या गाण्याच्या चित्रीकरणाचे कौतुक करून राऊत यांनी महामार्ग दुरवस्थेबाबत तातडीने प्राधिकरणाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे चळवळीच्या कार्यकर्त्यांना सांगितले.
यावेळी रवींद्र नलवडे, महेश महामुनी, महारुद्र तिकुंडे, महेश पवार, रोहित सपकाळ यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकार रस्ता चांगला कर...!
टोल विरोधी जनता चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते महेश पवार यांनी ‘सरकार रस्ता चांगला कर नाहीतर टोल बंद कर.. आता उठ सातारकर त्याच्यासाठी तूच काही तर कर’ हे गीत तयार केले आहे. अडीच मिनिटांच्या या गीतात पुणे- सातारा महामार्गावरून प्रवास करणाºयांच्या यातना कथित करण्यात आल्या आहेत. या गाण्याचा व्हिडीओही सध्या व्हायरल झाला असून, तोही समाज माध्यमांत चांगलाच पाहिला जात आहे. या व्हिडीओमध्ये सामान्य सातारकरांनी भूमिका बजावल्या आहेत.

Web Title: Officials shout 'toll free song'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.