उरमोडी धरण परिसरात संततधार कायम, धरणाचे दोन वक्री दरवाजे उघडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2019 03:24 PM2019-09-04T15:24:02+5:302019-09-04T15:25:16+5:30
गेल्या आठवडा भरापासून परळी ठोसेघर, कास, परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. ऐन गणपती उत्सवातच पावसाची रिपरिप सुरूअसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Next
ठळक मुद्देउरमोडी धरण परिसरात संततधार कायम नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
परळी : गेल्या आठवडा भरापासून परळी ठोसेघर, कास, परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. ऐन गणपती उत्सवातच पावसाची रिपरिप सुरूअसल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
उरमोडी धरण प्रकल्पात पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी दुपारी १२ वाजता विद्युत प्रकल्पाबरोबरच धरणाचे दोन वक्री दरवाजे ०.२५ ने उचलण्यात आले आहेत.
सद्य:स्थितीत उरमोडी प्रकल्पात ९.९१८ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. तर १८३६ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे. उरमोडी नदीपात्रात कोणीही जाऊ नये, अशा सूचना उरमोडी सिंचन विभागाच्या वतीने देण्यात आल्या आहेत.