Satara: खंबाटकी घाटात ऑइल गळती; दुचाकी घसरल्या, वाहतूक ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:03 IST2025-03-03T12:03:26+5:302025-03-03T12:03:41+5:30

शिरवळ (जि. सातारा) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये ऑइल वाहतुकीचा टँकर बंद पडून त्यामधून मोठ्या प्रमाणात ऑइलची गळती ...

Oil Spill at Khambataki Ghat on Pune Bangalore National Highway Bike accidents | Satara: खंबाटकी घाटात ऑइल गळती; दुचाकी घसरल्या, वाहतूक ठप्प

Satara: खंबाटकी घाटात ऑइल गळती; दुचाकी घसरल्या, वाहतूक ठप्प

शिरवळ (जि. सातारा) : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील खंबाटकी घाटामध्ये ऑइल वाहतुकीचा टँकर बंद पडून त्यामधून मोठ्या प्रमाणात ऑइलची गळती झाल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती. टँकरमधून गळती झालेल्या ऑइलमुळे असंख्य दुचाकी घसरून छोटे-मोठे अपघात झाले.

रविवारी सायंकाळी चारच्या सुमारास खंबाटकी घाटातील भैरवनाथ मंदिर परिसरामध्ये ऑइल वाहतूक करणारा टँकर (एमएच ०४-एचएस ६८४४) बंद झाला. त्यामधून मोठ्या प्रमाणावर ऑइलची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात रस्त्यावर ऑइल झाले. त्यामुळे दुचाकी व चारचाकीसह मोठे ट्रकही घसरू लागले.

यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहतूक विस्कळीत झाली होती. घटनेची माहिती मिळताच परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खंडाळा पोलिस पथकाने अग्निशमन पथकाच्या साह्याने रस्त्यावर पाणी मारून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू होता.

Web Title: Oil Spill at Khambataki Ghat on Pune Bangalore National Highway Bike accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.