आग्यामोहळच्या माशा चावल्याने वृद्धाचा मृत्यू
By नितीन काळेल | Published: April 26, 2024 09:09 PM2024-04-26T21:09:12+5:302024-04-26T21:09:34+5:30
याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
नितीन काळेल, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा : सातारा शहरातील बोगद्याच्या बाहेरील खाणीजवळ जनावरे चारण्यासाठी गेल्यावर आग्यामोहळच्या माशाने चावा घेतल्याने वृध्दाचा मृत्यू झाला. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राघू बाबूराव जांगळे (वय ६३, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे मृताचे नाव आहे. जांगळे हे सातारा शहरातील बोगद्याच्या बाहेर असलेल्या बंद खाणीजवळ म्हैस आणि गायी चारण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना आग्यामोहळच्या माशाने चावा घेतला होता. त्यानंतर त्यांना साताऱ्यातीलच दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात रोहीत राघू जांगळे यांनी खबर दिली. हवालदार निकम हे तपास करीत आहेत.