जुनी पेन्शन योजना: कऱ्हाडात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद, नागरिकांची गैरसोय

By प्रमोद सुकरे | Published: March 14, 2023 01:19 PM2023-03-14T13:19:09+5:302023-03-14T13:20:26+5:30

कर्मचाऱ्यांनी कार्यालयांच्या समोर उभे राहून केली घोषणाबाजी

Old Pension Scheme: Response to Govt Employees Strike in Karad, Inconvenience to Citizens | जुनी पेन्शन योजना: कऱ्हाडात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद, नागरिकांची गैरसोय

जुनी पेन्शन योजना: कऱ्हाडात शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला प्रतिसाद, नागरिकांची गैरसोय

googlenewsNext

कऱ्हाड : शासकिय कर्मचाऱ्यांनी मंगळवार पासून आपल्या मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्याला पहिल्याच दिवशी कराडात चांगला प्रतिसाद मिळाला.

कराडमधील महसूल विभाग आणि पंचायत समिती आज संपामुळे बंद होती. शासकीय कर्मचाऱ्यांनी कार्यालयांच्या समोर उभे राहून घोषणाबाजी केली. 'एकच मिशन जुनी पेन्शन' अशा घोषणानी परिसर दुमदुमून गेला.

दरम्यान  आपल्या विविध कामासाठी तालुक्यातून नागरिक या कार्यालयात आले होते. मात्र संपामुळे त्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. हा संप नक्की किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय आता माघार नाही असा आंदोलकांचा पवित्रा दिसत आहे.

Web Title: Old Pension Scheme: Response to Govt Employees Strike in Karad, Inconvenience to Citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.