आदर्की बुद्रुकमधील जुने वृक्ष ठरत आहेत धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:41 AM2021-05-08T04:41:10+5:302021-05-08T04:41:10+5:30
आदर्की : सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की बुद्रुक येथील रस्त्याला व वाहनाला अडथळा ठरत असलेले जुनाट वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व ...
आदर्की : सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की बुद्रुक येथील रस्त्याला व वाहनाला अडथळा ठरत असलेले जुनाट वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे. सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की फाटा ते फलटण दरम्यान संस्थान काळात आंबा, चिंच, वड, पिंपरण, आदी वृक्षांची लागवड केली होती. ती झाडे जुनी व धोकादायक झाली आहे, अशी धोकादायक झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदार काढतात, पण ठेकेदार फायद्याची ठरणारी झाडे काढतात, अशी लिंबाची झाडे व फांद्या काढल्या आहेत. आदर्की बुद्रुक येथे पिंपरण व वडाची अशी दोन वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत. वडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने उंच ट्रक व उसाच्या ट्रॉली फांदीला धडकतात, तर एका वेळी दोन वाहने झाडाखाली आल्यास वाहनास फांद्या धडकतात, तरी अपघात होण्याअगोदर संबंधित विभागाने धोकादायक वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकांतून होत आहे.