गौराईच्या निमित्ताने 'त्यांना' लागली घराची ओढ!, पोलीस महिला अस्वस्थ 

By प्रगती पाटील | Published: September 21, 2023 12:05 PM2023-09-21T12:05:15+5:302023-09-21T12:05:45+5:30

सातारा : लाडक्या गणपती बाप्पाचे जिल्ह्यात जल्लोशी स्वागत झाले. सातारकरांना सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी राबणाऱ्या पोलिस दलातील महिलांमध्ये ...

On the occasion of Gaurai, there was a feeling of homelessness However, there is uneasiness among the women in the police force | गौराईच्या निमित्ताने 'त्यांना' लागली घराची ओढ!, पोलीस महिला अस्वस्थ 

गौराईच्या निमित्ताने 'त्यांना' लागली घराची ओढ!, पोलीस महिला अस्वस्थ 

googlenewsNext

सातारा : लाडक्या गणपती बाप्पाचे जिल्ह्यात जल्लोशी स्वागत झाले. सातारकरांना सुरक्षितपणे गणेशोत्सव साजरा करता यावा यासाठी राबणाऱ्या पोलिस दलातील महिलांमध्ये मात्र अस्वस्थता आहे. पुसेसावळीत तणावाची परिस्थिती उद्भवल्यानंतर तिथे शांतता प्रस्थापित होईपर्यंत पोलिस यंत्रणा राबली. घटनेचे पडसाद गणेशोत्सवात उमटतील या शक्यतेने यंदा गणेश आगमनावारही पोलिसांची करडी नजर आहे. बंदोबस्ताच्या निमित्ताने परगावी ड्युटी लागलेल्या महिला कर्मचाऱ्यांना आता गौरी आगमनाच्या चिंतेने भेडसावले आहे.

पोलिसांना सणवार नसतो. फक्त ‘ड्युटी’ असते. सणासुदीत तर हमखास ते रस्त्यावरच असतात. कायदा, सुव्यवस्थेचा भार खांद्यावर पेलत ते कर्तव्य बजावतात. पुरूष कर्मचाऱ्यांसोबतच खांद्याला खांदा लावून महिला कर्मचाऱ्यांनाही बंदोबस्त करावा लागतो. ऐन सणावेळीच त्या बंदोबस्तात असतात. कुटूंबासमवेत सण साजरा करण्याची इच्छा असुनही कर्तव्याला प्राधान्य देत त्या ‘ड्युटी’ बजावतात.

मनातील सुप्त इच्छांना मुरड घालून त्या हे कर्तव्य जबाबदारीने निभावतात. सध्याही महिला पोलिसांची तीच अवस्था आहे. गौरी, गणपती सणाला थाटात प्रारंभ झालाय. मात्र, महिला पोलीस कर्तव्यावर आहेत. मंगळवारी गणपतीचे घरोघरी आगमन झाले. गुरूवारी सोनपावलांनी गौराईही घरोघरी आगमन करेल. मात्र, गौराईच्या सणाला तरी बंदोबस्तातून सवलत मिळेल का, अशी चलबिचल त्यांच्यात सुरू झाली आहे.

गणपती आणले, गौरी कशी येईल?

पुसेसावळीतील तणाव निवळण्यासाठी पोलीस यंत्रणेने दिवसरात्र एक केले. या तणावाचे पडसाद गणेशोत्सवावर उमटू नयेत म्हणून गणपती आगमनादिवशी पै पाहुणे, शेजारी नातेवाईक, मित्र यांच्या मदतीने गणपती बाप्पा पोलिसांच्या घरी विराजमान झाले. पण गौरी आगमन सोहळा कुटूंबातील महिलेशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. गौरीसाठी आवश्यक असणा-या पुजेपासून सर्वच गोष्टींसाठी घरातील महिलाच लागते. पण बंदोबस्ताच्या निमित्ताने आपल्या घरापासून लांब गेलेल्या कर्मचारी भगिनी गौराई घरी कशी आणायची या पेचात आहेत.

या कारणांनी विस्कटली घडी!

गत सप्ताहात पुसेसावळीमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा हाय अलर्टवर राहिली. आॅगस्टच्या दुस-या आठवड्यात व्हायरल झालेल्या पोस्टमुळे शहरात काही दिवस तणावाचे वातावरण होते. पोलिस यंत्रणांनी यातील दोषी पकडल्यानंतर यंत्रणा उसंत घेणार तोच पुसेसावळीमध्ये तणाव निर्माण झाला. गणेशोत्सवात अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिस यंत्रणेला हाय अर्लटवर रहावे लागले. जिल्ह्यातील संवेदनशिल ठिकाणी पोलीसांची वाढीव कुमक पाठवावी लागल्याने यंदा पोलीस बंदोबस्ताची घडी विस्कटली आहे.

पोलिस भगिनींचा जीव कासावीस

पोलिस कर्मचाऱ्यांबरोबर महिला कर्मचारीही बंदोबस्तावर आहेत. आवश्यकतेनुसार त्यांना वेगवेगळ्या शहरात नेमणूक मिळाली आहे. सूर्यनारायणाच्या साक्षीने सुरू झालेला बंदोबस्त रात्री उशिरा शिथिल होतो. मग गौराईसाठी घरी जायचे कधी, अन् कसं याचं उत्तर त्यांना मिळेना. गवराईची काहीच पूर्वतयारी झाली नसल्याने या पोलिस भगिनींचा जीव कासावीस झाला आहे.

Web Title: On the occasion of Gaurai, there was a feeling of homelessness However, there is uneasiness among the women in the police force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.