आरोग्य अन् शिक्षण विभागातील विषय अजेंड्यावर; सातारा जिल्हा परिषद ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा

By नितीन काळेल | Published: January 9, 2024 07:32 PM2024-01-09T19:32:07+5:302024-01-09T19:32:25+5:30

सातारा : जिल्हा परिषद ठराव समितीच्या सभेत आरोग्य आणि शिक्षण विभागातील अनेक विषय अजेंड्यावर होते. यावर सविस्तर चर्चा होऊन ...

On the subject agenda in the Department of Health and Education; Various topics were discussed in the Satara Zilla Parishad resolution committee meeting | आरोग्य अन् शिक्षण विभागातील विषय अजेंड्यावर; सातारा जिल्हा परिषद ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा

आरोग्य अन् शिक्षण विभागातील विषय अजेंड्यावर; सातारा जिल्हा परिषद ठराव समिती सभेत विविध विषयांवर चर्चा

सातारा : जिल्हा परिषद ठराव समितीच्या सभेत आरोग्य आणि शिक्षण विभागातील अनेक विषय अजेंड्यावर होते. यावर सविस्तर चर्चा होऊन अनेक विषयांना मंजुरी देण्यात आली.

जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्या अध्यक्षतेखाली ठराव समितीची सभा झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक संतोष हराळे, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले, ग्रामपंचायत विभागाच्या अर्चना वाघमळे, पाणी व स्वच्छता विभागाच्या क्रांती बोराटे, महिला व बालविकासच्या रोहिणी ढवळे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राहुल कदम आदी उपस्थित होते.

सभेत सुरुवातीला २८ डिसेंबर रोजी झालेल्या सभेचा कार्यवृत्तांत वाचून कायम करण्यात आला. तसेच मागील सभेतील कार्यवाहीचा आढावाही घेण्यात आला. तर कऱ्हाड तालुक्यातील कोडोली येथील गायरान जागेतील नियोजित प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसरात अंगणवाडी आणि क्रीडांगणासाठी उर्वरित जागा वापरण्याच्या परवानगीबाबत चर्चा करण्यात आली.

तसेच जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर अनुदानातून आरोग्य केंद्रांना आैषधे आणि साहित्य खरेदी करण्यायाठी तयार केलेल्या पोर्टलवरील दरास मान्यतेबाबतही चर्चा झाली. तर जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शाळेच्या खोल्या निर्लेखन करणे आणि पाडण्यावरही चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली. त्याचबरोबर सभेत एेनवेळच्या इतर काही विषयांवरही चर्चा करण्यात आली.

Web Title: On the subject agenda in the Department of Health and Education; Various topics were discussed in the Satara Zilla Parishad resolution committee meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.