कोरेगाव तालुक्याला पुन्हा एकदा गारपिटीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:43 AM2021-04-28T04:43:24+5:302021-04-28T04:43:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोरेगाव : कोरेगाव तालुक्याला दोन आठवड्यात दुसऱ्यांदा गारपिटीचा तडाखा बसला असून, उसासह टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोरेगाव : कोरेगाव तालुक्याला दोन आठवड्यात दुसऱ्यांदा गारपिटीचा तडाखा बसला असून, उसासह टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या तडाख्यातून कसेबसे बाहेर पडत असताना निसर्गाने पुन्हा एकदा दणका दिल्याने शेतकरीवर्ग अक्षरश: हवालदिल झाला आहे.
तालुक्यात गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण असल्याने उष्म्यामध्ये वाढ झाली आहे, पर्यायाने विहिरींची पाणी पातळी खोल गेली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने शेतकऱ्यांची पळापळ झाली आहे.
सोमवारी काही भागांत पाऊस झाला. मात्र, मंगळवारी दुपारी ४ च्या सुमारास
पावसाचे आगमन झाले.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांना नेस्तनाबूत केले आहे.
गारपिटीमुळे ऊसासह टोमॅटो पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतात सर्वत्र
पांढरी चादर तयार झालेली होती. कोरोनाच्या तडाख्यातून कसेबसे बाहेर पडत असताना निसर्गाने पुन्हा एकदा दणका दिल्याने शेतकरीवर्ग अक्षरश: हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.