शॉर्टसर्किटने दीड एकर ऊसाला लागली आग, दोन लाखांचे नुकसान, मलवडी येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 05:38 PM2022-02-09T17:38:30+5:302022-02-09T17:59:47+5:30
आदर्की : मलवडी (ता. फलटण) येथील शेतकरी सदाशिव कांरडे यांच्या दीड एकर उसाला शार्टसर्किटने आग लागली. या आगीत दीड ...
आदर्की : मलवडी (ता. फलटण) येथील शेतकरी सदाशिव कांरडे यांच्या दीड एकर उसाला शार्टसर्किटने आग लागली. या आगीत दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा गाव कामगार तलाठी यांनी केला आहे. आज, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.
मलवडी येथील शेतकरी सदाशिव कांरडे यांच्या मालकीच्या गट नं. ३१० मधील तोडणीस आलेल्या उसाला शॉर्टसर्किटने आग लागली. दरम्यान शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केल्याने आग आटोक्यात आली. शेतकऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणल्याने पंधरा ते वीस एकर ऊस आगीपासून वाचल्याने मोठे नुकसान टळले.
सदाशिव कांरडे यांनी ऊस जळाल्याची माहिती तलाठ्यांना दिली. यानंतर तलाठ्यांनी झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्याचा अहवाल ते तहसीलदारांना सादर करणार आहेत.
मलवडी येथील गट नं. ३१० मधील ६० आर क्षेत्रात उसाची लागण केली होती. त्या क्षेत्रावरून वीजवितरण कंपनीच्या वीजवाहक तारा गेल्या आहेत. तारांमुळेच उसाला आग लागली. तरी तोडणीस आलेला ऊस जळाल्याने नुकसान भरपाई मिळावी. -सदाशिव कांरडे, शेतकरी