कऱ्हाड शहरात दीडशेवर ‘अॅक्टिव्ह’ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:33+5:302021-04-16T04:40:33+5:30
जिल्हा प्रशासनाच्या गुरुवारच्या अहवालानुसार, शहरातील ३२ जणांचे अहवाल बाधित आले आहेत. त्यामध्ये बुधवार पेठेतील ३, सोमवार पेठ ४, मंगळवार ...
जिल्हा प्रशासनाच्या गुरुवारच्या अहवालानुसार, शहरातील ३२ जणांचे अहवाल बाधित आले आहेत. त्यामध्ये बुधवार पेठेतील ३, सोमवार पेठ ४, मंगळवार पेठ १, शुक्रवार पेठ १, शनिवार पेठ ४, वाखाण १, इतर १८ जणांचा समावेश आहे. शहरातील नागरिकांना शासन निर्णयानुसार क्रमवारीने लसीचे डोस दिले जात आहेत. त्याचप्रमाणे कृष्णा हॉस्पिटलने लसीकरणाकरिता पालिकेसाठी प्रशिक्षित स्टाफ दिला आहे. पालिका प्रशासन नियमित कामकाज करून कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक ते सर्व कामही करीत आहे. लवकरात लवकर शहरातील नागरिकांना डोस देण्याची प्रक्रिया गतीने सुरू आहे.
जसजसे लसीचे डोस उपलब्ध होतील तसतसे कामकाज गतीने होत आहे. शहरातील प्रभागनिहाय लसीकरणाची मोहीम हाती घेतली असून पाच ठिकाणी सध्या लसीकरणाचे काम सुरू आहे. ४५ वयाच्या पुढील लोकांना लस देण्याचे काम केले जात असून शासन ज्या पद्धतीने निर्णय घेईल तसे लसीकरण केले जात आहे.
- चौकट
पाच ठिकाणी लसीकरण केंद्र
१) पत्रकार भवन
२) शाळा क्रमांक चार
३) खराडे कॉलनी
४) वाखान परिसर
५) नागरी आरोग्य केंद्र