गळ्याला कोयता लावून दीड लाखाची रोकड लुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:40 AM2021-04-22T04:40:35+5:302021-04-22T04:40:35+5:30

सातारा : शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना सहा जणांनी ...

One and a half lakh cash was looted by putting a scythe around his neck | गळ्याला कोयता लावून दीड लाखाची रोकड लुटली

गळ्याला कोयता लावून दीड लाखाची रोकड लुटली

Next

सातारा : शिवथर, ता. सातारा गावच्या हद्दीत धोम डाव्या कालव्यालगत रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसलेल्या दोघांना सहा जणांनी गळ्य़ाला कोयता लावून १ लाख ७३ हजारांची रोकड, मोबाइल, किमती घड्याळ असा एकूण दोन लाखांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली.

याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात अजित शिवाजी निकम (४३, मूळ रा. तडवळे संमत कोरेगाव, सध्या रा. रामडोह आळी, वाई) यांनी तक्रार दिली आहे. दि. १८ रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ही घडली असून तक्रारदार अजित निकम व त्यांचा मित्र अमित अशोक साबळे हे शिवथर गावच्या हद्दीतील धोम कालव्यानजिक रस्त्याच्या कडेला मद्यपान करत बसले होते.

त्यावेळी अचानक दोन मोटारसायकलवरून सहा २० ते २५ वयोगटातील युवक तिथे आले. त्यांनी अजित निकम यांच्या डोक्यात कोयत्याची मूठ मारली. तर अमित साबळे याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी चोरट्यांनी अमित साबळे यांच्या गळ्य़ाला कोयता लावून त्यांना जीवे मारण्याचा धाक दाखवून निकम यांच्याकडे असलेली रोख रक्कम १ लाख ७३ हजार, दोन मोबाइल, घड्याळ असा एकूण दोन लाख रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून चोरून नेला.

या घटनेमुळे निकम व साबळे भयभीत झाले. अजित निकम यांनी दि. २० रोजी याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात जाऊन अज्ञात सहा चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. घटनास्थळी सहायक पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी भेट दिली असून तपासाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. सहाजणांवर दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी अधिक तपास करत आहेत.

Web Title: One and a half lakh cash was looted by putting a scythe around his neck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.