एक दिवसाच्या पावसाने सत्तर विहिरी तुडुंब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2017 05:02 PM2017-08-05T17:02:29+5:302017-08-05T17:02:29+5:30

म्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पावसाने परिसरातील सत्तरहून अधिक विहिरी तुडुंब भरल्या. पन्नास दिवसानंतरही त्या विहिरी भरलेल्या आहेत.

One day's rain, seventy wells! | एक दिवसाच्या पावसाने सत्तर विहिरी तुडुंब!

एक दिवसाच्या पावसाने सत्तर विहिरी तुडुंब!

Next
ठळक मुद्देपन्नास दिवसानंतरही पाणी वॉटर कप स्पर्धेअंतर्गत कारखेल ग्रामस्थांच्या श्रमदानाचे फळ

म्हसवड : पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचा शिक्का पुसण्यासाठी माण तालुक्यातील कारखेल ग्रामस्थांनी यंदा चांगलीच कंबर कसली. वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान करुन जलसंधारणाची कामे उभारली. या हंगामात एक दिवसच गावात पाऊस झाला. पण या पावसाने परिसरातील सत्तरहून अधिक विहिरी तुडुंब भरल्या. पन्नास दिवसानंतरही त्या विहिरी भरलेल्या आहेत. 

कारखेल ग्रामस्थांनी उभारलेल्या जलसंधारण कामातून व त्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीतून चांगले चित्र दिसत आहे. पाणी फाउंडेशनमध्ये सहभागी होत ग्रामस्थांनी ४५ दिवस श्रमदान केले. त्यानंतर एकच पाऊस झाला त्यामुळे ४५ दिवसांच्या श्रमाची आणि एक दिवसाच्या पावसाच्या कमालीचे यश कारखेल ग्रामस्थ अनुभवत आहेत.

 म्हसवडच्या उत्तरेला सोलापूर जिल्ह्यााच्या सीमेवर डोंगराच्या कुशीत १, ५७७ लोकसंख्येचं कारखेल गांव वसलेले आहे. कायम दुष्काळी परिस्थितीशी झगडत अनेक पिढ्या संपल्या तरी येथील दुष्काळ संपला नाही.

‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा’ सुरू झाली. गावाने स्पर्धेत सहभागी होत श्रमदानाला सुरुवात केली. ८ एप्रिलला सुरू झालेलं श्रमदान २२ मेपर्यंत सुरू होतं. सलग ४५ दिवस श्रमदानाच काम करून या लोकांनी गावासाठी एक आगळावेगळा इतिहास रचला. मायभूमीचे ऋण फेडण्यासाठी आणि तिला सुजलाम् सुफलाम् बनविण्यासाठी गाव एकवटला, आणि एक वेगळच तुफान आलं.

घराघरात फक्त पाणी फाउंडेशनच्या गोष्टी होऊ लागल्या. लोकं पाण्याबाबत जागृत झाली आणि एकमेकांना पाण्याचे महत्त्व पटवून दिले. इतर ठिकाणी स्थायिक झालेली सगळी लोकं गावासाठी पुन्हा एकत्र आली. पाण्यासाठी सुरू केलेल्या लढ्यात तेवढ्याच तळमळीने सहभागी झाली. पन्नास दिवसांपूर्वी पडलेल्या पावसाने डोंगरावरून येणाºया पाण्याची धार सुरूच असल्याने गावातील पाझर तलाव, सत्तर विहिरींमध्ये तुडुंब पाणी आहे.

केवळ २२ टक्केच काम

स्पर्धेदरम्यान अनेक मान्यवरांनी याठिकाणी भेट देऊन प्रोत्साहन दिलं. यातूनच ४५ दिवस न थकता काम करण्याचं बळ मिळालं. आणि ते कामही तेवढ्याच उत्साहात पूर्ण झालं. हे काम झाले असले तरी गावच्या एकूण क्षेत्रातील २२ टक्के च काम झाले. उर्वरीत भागातील मृदसंधारण व जलसंधारणाचे काम झाल्यास येथील सतत पडणाºया दुष्काळावर मात करता येणार आहे.

खूप काही कामं

२४ नालाबांध
१७ जुन्या नालाबांधची दुरुस्ती
२ तलावांची गळती काढली
१७ किलोमीटर डीपसीसीटी
२० लुज बोल्डर
१६५ हेक्टरवर कंपाटमेंट बंडींग
प्रत्येक कुटुंबाला पाच झाडे यामध्ये आंबा, सिताफळ, जांभूळ, कवट या फळांची झाडे देऊन ती जगवण्यासाठीची हमी घेतली.
विद्यार्थ्यांना एक झाड दिले तसेच गावात येणाºया रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपणही केले. 

 

आजपतूर आम्ही राणात बाजरी, मूग अशीच पिकं घेयचू, पण काम झालं आनं पाणी आल्याने आमी आता कापूस लावला. मला पन्नास वर्षात येवढं जिवंत पाणी बघायला मिळालं नव्हतं.

- सुशिला तात्यासाहेब गायकवाड,
वय ८० रा. कारखेल

पडणाºया पावसाचे सोलापूर जिल्ह्यात वाहून जाणारे पाणी अडविण्यात यशस्वी झालो. ते पाणी ओढा जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गावातील शेतीसाठी आणण्यात यशस्वी झालो असलो तरी अजूनही खूप काम बाकी आहेत. ते करुन आमच्या गावची ओळख दुष्काळी म्हणून न राहता बागायती गाव म्हणून होण्यासाठी यापुढील काळात प्रयत्नशील राहणार आहे.

- रमेश गायकवाड,
उपसरपंच कारखेल 

Web Title: One day's rain, seventy wells!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.