भिंतीला प्लास्टर करताना पायडावरून पडून एकाचा मृत्यू
By दत्ता यादव | Updated: June 15, 2024 14:25 IST2024-06-15T14:25:16+5:302024-06-15T14:25:52+5:30
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शमशेर पठाण हे एलबीएस काॅलेजजवळील एका घरात पायडावर उभे राहून भिंतीला प्लास्टर करत होते.

भिंतीला प्लास्टर करताना पायडावरून पडून एकाचा मृत्यू
सातारा : भिंतीला प्लास्टर करताना पायडावरून पडून एकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. १३ रोजी एलबीएस काॅलेजजवळ घडली. शमशेर बाबुलाल पठाण (वय ५०, रा. सदर बझार सातारा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शमशेर पठाण हे एलबीएस काॅलेजजवळील एका घरात पायडावर उभे राहून भिंतीला प्लास्टर करत होते. मात्र, अचानक पायडावरून ते खाली पडले. यात त्यांच्या डोक्याला आणि हातापायाल गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, दि. १४ रोजी दुपारी साडेचार वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून, हवालदार महेंद्र पाटोळे हे अधिक तपास करीत आहेत.