महू धरणात पाय घसरून बुडाल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 05:53 PM2019-08-20T17:53:07+5:302019-08-20T17:54:15+5:30

पाचगणी : महू धरणात दापवडी, ता. जावळी येथे सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय ५४, वर्षे ...

One dies after drowning in Mahu Dam | महू धरणात पाय घसरून बुडाल्याने एकाचा मृत्यू

महू धरणात पाय घसरून बुडाल्याने एकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमहू धरणात पाय घसरून बुडाल्याने एकाचा मृत्यूधरणाच्या पाण्यात आढळून आला मृतदेह

पाचगणी : महू धरणात दापवडी, ता. जावळी येथे सोमवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय ५४, वर्षे रा. बेलोशी, ता जावळी, हे धरणाच्या पाण्यात पाय घसरून पडले होते. आज सकाळी महाबळेश्वर टेकर्सच्या शोधपथकाच्या साह्याने शोधमोहीम राबविण्यात आली असता त्यांचा मृतदेह धरणाच्या पाण्यात आढळून आला आहे. त्यामुळे नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या बाबतच मेढा पोलीस स्टेशन अंकित करहर दुरक्षेत्रातून मिळालेली अधिक माहिती अशी की काल संध्याकाळी सहा च्या दरम्यान किसन महादेव गावडे, वय वर्षे ५४, रा. बेलोशी, ता. जावळी हे महू धरणाच्या पाण्यात दापवडी, या ठिकाणी पाय घसरून पडले होते. या बाबतची फिर्याद नितीन बाळासाहेब गावडे रा. बेलोशी यांनी करहर दुरक्षेत्राला दिली त्यानुसार सोमवारी धरण परिसरात पडलेल्या ठिकाणी शोध घेण्याचा पोलीस व गावकऱ्यांनी प्रयत्न केला परंतु अंधार झाल्याने शोधमोहीम थांबवावी लागली होती.

त्यानंतर शोधमोहीम करण्याकरिता पोलीस स्टेशनच्या वतीने महाबळेश्वर टेकर्स याना पाचारण करण्यात आले. त्यानुसार आज सकाळी महाबळेश्वर टेकर्सचे शोधपथक घटना स्थळी पोहचले व त्यांनी सकाळी नऊ वाजता शोधमोहीम हाती घेतली थोड्याच वेळात पाण्यात पडलेल्या ठिकाणी महाबळेश्वर टेकर्सच्या शोधपथकाने शोध घेतला असता अथक परिश्रमानंतर मृतदेह धरणामध्ये सापडला.

यामध्ये महाबळेश्वर टेकर्सच्या अक्षय नाविलकर, अनिल केळगणे, सुनील भाटिया, जयंत बिरामने, अक्षय जाधव, सुनील कदम, सुनील वाडकर, अमित कोळी, या टेकर्सनी शोधमोहिमेत विशेष परिश्रम घेतले. त्यांस दापवाडी गावचे ग्रामस्थ, व पोलीस पाटील अनिल रांजणे, कुडाळ हद्दीतील बेलवडे गावचे पोलीस पोटील निशांत रोकडे यांनी सहकार्य केले आहे.

त्यानंतर पंचनामा करून मृतदेह मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. या घटनेचा अधिक तपास मेढा पोलीस स्टेशनचे सपोनि नीलकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करहर दुरक्षेत्राचे ठाणे अंमलदार शिंदे डी. जी करीत आहेत.


जावळी तालुका दुर्गम असून कुडाळ व मेढा, या विभागात विभागला आहे. शवविच्छेदानाची सुविधा फक्त मेढा याच ठिकाणी उपलब्ध असल्याने नातेवाईकांची मोठी हेळसांड होते. सोमार्डी,ग्रामीण रुग्णालय किंवा कुडाळ,प्राथमिक आरोग्य केंद या पैकी एका ठिकाणी शवविच्छेदनाची सोय उपलब्ध केल्यास या विभागातील नागरिकांची होणारी हेळसांड थांबणार आहे.

Web Title: One dies after drowning in Mahu Dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.