पोकलॅन्डच्या बकेटखाली सापडून एकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:44 AM2021-09-21T04:44:12+5:302021-09-21T04:44:12+5:30
सातारा : येथील शेंद्रे (ता. सातारा) परिसरातील मळाइच्या डोंगरामधील क्रशरच्या खाणीमध्ये पोकलॅन्डच्या बकेटखाली सापडून डंपरचालकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात ...
सातारा : येथील शेंद्रे (ता. सातारा) परिसरातील मळाइच्या डोंगरामधील क्रशरच्या खाणीमध्ये पोकलॅन्डच्या बकेटखाली सापडून डंपरचालकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. संबंधितांनी संबंधित चालकाचा केबीनमधून तोल जाऊन पडून मृत्यू झाल्याचे सांगितले होते.
याबाबत अधिक माहिती अशी, शेंद्र येथील क्रशरच्या खाणीमध्ये दोन दिवसांपूर्वी कुमार हणमंत देशमुख (वय ५५, रा. सोनगाव, ता. सातारा) यांचा मृत्यू झाला होता. कुमार हे ट्रकचालक असून, ते ट्रकच्या केबीनमध्ये चढत असताना तोल जाऊन खाली पडून त्यांचा मृत्यू झाल्याची सुरुवातीला पोलीस ठाण्यात नाेंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांना यामध्ये शंका आल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. साजीद अन्सारी (मूळ रा. झारखंड, सध्या रा. पिरवाडी) याने अचानक पोकलॅन्ड सुरू केला. याचवेळी डंपरवरील चालक कुमार देशमुख हे तेथे उभे होते. पोकलॅन्डच्या बकेटखाली ते सापडले. बकेट स्विंग होऊन ते कुमार देशमुख यांच्या बरकडीस व छातीला लागले. यामध्ये बकेटची जोरात धडक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याबाबत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत देव यांनी फिर्याद दिली असून, साजीद अन्सारी याच्यावर हलगर्जीपणाचा गुन्हा सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाला आहे.