अत्याचार केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:41 AM2021-02-11T04:41:28+5:302021-02-11T04:41:28+5:30

नाना भालगू जाधव (रा. गोपाळ वस्ती, पार्ले, ता. क-हाड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत जिल्हा सरकारी वकील ...

One hard labor in case of torture | अत्याचार केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी

अत्याचार केल्याप्रकरणी एकास सक्तमजुरी

Next

नाना भालगू जाधव (रा. गोपाळ वस्ती, पार्ले, ता. क-हाड) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंध व मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नाना जाधव याच्यावर क-हाड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सहायक पोलीस निरीक्षक व्ही.पी. वंजारी यांनी या प्रकरणाचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. जिल्हा व सत्र न्या. एस.ए.ए.आर. औटी यांच्यासमोर या खटल्याची सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मिलिंद कुलकर्णी यांनी काम पाहिले. सरकार पक्षाने या खटल्यात चार साक्षीदार तपासले. सरकारी वकिलांचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्यायालयाने आरोपी नाना जाधव याला दीड वर्ष सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

Web Title: One hard labor in case of torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.