शंभर टक्के कामे होऊनही दुष्काळच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:03 PM2019-08-04T23:03:02+5:302019-08-04T23:04:55+5:30

स्वप्नील शिंदे। सातारा : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेत सातारा जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. शासकीय ...

One hundred percent of the work is still drought | शंभर टक्के कामे होऊनही दुष्काळच

शंभर टक्के कामे होऊनही दुष्काळच

Next

स्वप्नील शिंदे।
सातारा : महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेत सातारा जिल्ह्याने मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे केली. शासकीय आकडेवारीनुसार चार वर्षांत एकूण ७२५ गावांमध्ये हे अभियान राबविले असून, त्याच्या माध्यमातून ५३ हजार ७०८. ८० टीसीएम (दोन सिंचनासाठी) पाणीसाठा निर्माण झाला. मात्र, आजही ३ लाख ७७ हजार ११० लोकांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात असून, १२० चारा छावण्या सुरू आहेत.

२२९ गावांना टॅकरने पाणी...
सध्या २२९ गावे व ९१६ वाड्या-वस्त्यांना २६० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये ९ शासकीय, २६१ खासगी टँकरचा समावेश आहे. जलयुक्त अभियान राबविलेल्या अनेक गावांमधील लोकांना टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. तर १ लाख ९१ हजार ४३२ जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याने १२० चारा छावण्या सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच शेळ्या-मेंढ्यांसाठी राज्यातील पहिली छावणी पिंगळी येथे उभारली आहे.
कामे
जलयुक्त शिवार अभियानात जलसंधारणाच्या माध्यमातून विभागात पाणलोटाची कामे, सिमेंट साखळी नाला बांधकामे, जुने अस्तित्वातील सिमेंट नालाबांध/ केटीवेअर
दुरुस्ती व नूतनीकरण, जलस्त्रोतातील गाळ काढणे, जलस्त्रोत बळकटीकरण, विहीर पुनर्भरण, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर आणि ओढे / नाले जोड कामे हाती घेण्यात आली.

Web Title: One hundred percent of the work is still drought

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.