जमिनीच्या वादातून एकाचा खून; दोघे जखमी
By संजय पाटील | Published: March 27, 2024 10:17 PM2024-03-27T22:17:53+5:302024-03-27T22:18:18+5:30
म्होप्रेतील घटना : धारदार शस्त्राने केले वार; तिघांवर गुन्हा दाखल
कऱ्हाड : जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने वार करून एकाचा खून करण्यात आला. तर हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले. म्होप्रे, ता. कऱ्हाड येथे बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तिघांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
प्रकाश बाबुराव सकपाळ-पाटील (वय ६०) असे खून झालेल्याचे नाव आहे. तर किशोर सकपाळ-पाटील, किरण सकपाळ-पाटील हे दोघे जखमी झाले आहेत. रणजीत जाधव (रा. गोळेश्वर), अनिल सकपाळ, सुनील सकपाळ अशी संशयीतांची नावे आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या तसेच पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्होप्रे येथील प्रकाश सकपाळ-पाटील आणि अनिल सकपाळ यांच्यात जमिनीचा वाद होता. बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास प्रकाश सकपाळ-पाटील हे म्होप्रे येथील बसथांब्यानजीक असताना संशयित तिघे त्याठिकाणी आले. त्यांनी प्रकाश सकपाळ-पाटील यांच्याशी जमिनीच्या कारणावरून वाद घातला. या वादातूनच त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यावेळी संशयतांनी त्यांच्याकडील धारदार शस्त्राने प्रकाश यांना भोकसले. तसेच त्याठिकाणी असलेल्या किशोर व किरण सकपाळ-पाटील या दोघांवरही शस्त्राने वार करण्यात आले.
घटनेची माहिती कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. रात्री पोलीस त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिला. याप्रकरणी तिघां