महिलेच्या पर्समधील एक लाखाचे दागिने लांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:50 PM2019-09-14T12:50:37+5:302019-09-14T12:51:49+5:30

बसमधून उतरत असताना अज्ञाताने महिलेच्या पर्समधील सुमारे पाच तोळ्याचे एक लाखाचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना सातारा बसस्थानकात दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

One lacquered jewelry in a woman's purse | महिलेच्या पर्समधील एक लाखाचे दागिने लांबविले

महिलेच्या पर्समधील एक लाखाचे दागिने लांबविले

Next
ठळक मुद्देमहिलेच्या पर्समधील एक लाखाचे दागिने लांबविले सातारा बसस्थानकातील प्रकार

सातारा : बसमधून उतरत असताना अज्ञाताने महिलेच्या पर्समधील सुमारे पाच तोळ्याचे एक लाखाचे दागिने आणि रोकड चोरून नेल्याची घटना सातारा बसस्थानकात दि. ९ रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

उर्मिला लक्ष्मण पवार (वय ५६, रा. बोरवली, इस्ट मुंबई) या पतीसोबत वाई-सातारा विनाथांबा बसमधून सातारा बसस्थानकात आल्या. बसमधून उतरत असताना त्यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्समधून अज्ञात चोरट्याने पर्सची चैन उघडली.

त्यानंतर पर्समधील पाच तोळ्याचे मंगळसूत्र आणि रोकड चोरट्याने हातोहात लांबविली. हा प्रकार त्यांच्या काहीवेळानंतर लक्षात आला. मात्र, तोपर्यंत चोरटा पसार झाला होता.

Web Title: One lacquered jewelry in a woman's purse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.