जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ग्राहकांकडून १० महिन्यांत वीज बिलांचा एकदाही भरणा नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:32 AM2021-01-09T04:32:34+5:302021-01-09T04:32:34+5:30

सातारा : अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रांत वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या ...

One lakh 63 thousand customers in the district do not pay their electricity bills even once in 10 months | जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ग्राहकांकडून १० महिन्यांत वीज बिलांचा एकदाही भरणा नाही

जिल्ह्यात एक लाख ६३ हजार ग्राहकांकडून १० महिन्यांत वीज बिलांचा एकदाही भरणा नाही

Next

सातारा : अतिदुर्गम खेड्यापाड्यांपासून सर्वच क्षेत्रांत वीजसेवा देणाऱ्या व जनतेच्या मालकीची वीज कंपनी असलेल्या महावितरणची आर्थिक स्थिती वीज बिलांच्या वाढत्या थकबाकीमुळे गंभीर झाली आहे. वीजक्षेत्रातील संभाव्य अरिष्ट टाळण्यासाठी वीजग्राहकांनी चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

गतवर्षी मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तब्बल एक लाख ६३ हजार वीजग्राहकांनी एकाही महिन्याचे वीज बिल भरलेले नाही. सध्या वीजपुरवठा सुरू असलेल्या या सर्व ग्राहकांकडे तब्बल ९१ कोटी ९२ लाख रुपयांची थकबाकी आहे. सध्या जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील तीन लाख १७ हजार ग्राहकांकडे तब्बल १४५ कोटी ३० लाख रुपयांची थकबाकी आहे.

कोरोना संकटातील ‘लॉकडाऊन’मध्ये मीटर रीडिंग घेता आले नाही. ‘अनलॉक’नंतर देण्यात आलेल्या सरासरी वीजबिलांची योग्य दुरुस्ती करण्यात आली. तसेच मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल देण्याची प्रक्रियाही पूर्ववत झाली. अनलॉकनंतर मीटर रीडिंगप्रमाणे देण्यात आलेली वीज बिले अचूक असल्याचा निर्वाळा तज्ज्ञांनीही दिलेला आहे. मात्र गेल्या एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यातील एक लाख ६३ हजार १३४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांनी माहे नोव्हेंबरपर्यंतच्या एकाही वीज बिलाचा भरणा केला नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे थकबाकीमध्ये तब्बल ९१ कोटी ९२ लाख रुपयांची भर पडली आहे.

गेल्या १५ वर्षांमध्ये विविध गंभीर संकटांवर मात करीत महावितरणने देशाच्या वीजक्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. देशपातळीवर नावलौकिक मिळविला आहे. जागतिक तंत्रज्ञानाची ग्राहकसेवा आता वीजग्राहकांना घरबसल्या मोबाईल अ‍ॅपसह ‘ऑनलाईन’द्वारे उपलब्ध आहे. देशात सर्वाधिक म्हणजे सुमारे पावणेतीन कोटी वीजग्राहक हे महावितरणचे आहेत. फोटो मीटर रीडिंगप्रमाणे वीज बिल देण्यास प्रारंभ करणारी महावितरण ही देशातील पहिली वीज वितरण कंपनी आहे. मात्र वाढत्या थकबाकीच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी व पुरवठा यांमध्ये महावितरणला वीजखरेदीचा आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी सध्या वीजग्राहकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे. त्यामुळे थकीत व चालू वीज बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणकडून आवाहन करण्यात येत आहे.

चौकट :

जिल्ह्यातील विभागनिहाय ग्राहकसंख्या (कंसात थकबाकी) पुढीलप्रमाणे :

सातारा विभागात ३२ हजार ८०६ ग्राहकांची १८.८० कोटी, कऱ्हाड विभागात ४४ हजार ६२८ ग्राहकांची २५.२६ कोटी, फलटण विभागात ३५ हजार ७१३ ग्राहकांची २० कोटी, वडूज विभागात २४ हजार ३०५ ग्राहकांची ११.८४ कोटी, तर वाई विभागात २५ हजार ६८४ ग्राहकांची १६.०२ कोटी थकबाकी दिसत आहे.

Web Title: One lakh 63 thousand customers in the district do not pay their electricity bills even once in 10 months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.