Satara News: उसाची मोळी अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 01:04 PM2023-02-20T13:04:48+5:302023-02-20T13:31:15+5:30
उपचारापूर्वीच मृत्यू झाला
कऱ्हाड : उसाचा भारा अंगावर पडल्यामुळे एकाचा मृत्यू झाला. रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर ही घटना घडली. याबाबतची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.
शंकर रामचंद्र डोईफोडे (वय ४०, रा. रेठरे बुद्रूक, ता. कऱ्हाड) असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रूक येथील कृष्णा कारखान्यावर काम करीत असताना ट्रॉलीतून उचललेला उसाचा भारा अचानक शंकर डोईफोडे यांच्या अंगावर पडला. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. घटनेची नोंद कऱ्हाड ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.