सातारा : भुयारी गटर साफ करताना एकाचा गुदमरून मृत्यू, कराडात घडली दुर्देवी घटना

By प्रमोद सुकरे | Published: September 14, 2022 05:43 PM2022-09-14T17:43:38+5:302022-09-14T17:44:16+5:30

स्वच्छता करीत असताना श्वास गुदमरल्याने ते बेशुद्ध पडले

One person died of suffocation while cleaning subway gutters, incident in Karad satara district | सातारा : भुयारी गटर साफ करताना एकाचा गुदमरून मृत्यू, कराडात घडली दुर्देवी घटना

सातारा : भुयारी गटर साफ करताना एकाचा गुदमरून मृत्यू, कराडात घडली दुर्देवी घटना

Next

कराड : शहराच्या वाखाण परिसर येथे मोठी दुर्घटना घडली. भुयारी गटर साफ करत असताना नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. तर मदतीला गेलेला दुसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. अनिरूध्द लाड असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे तर जखमीचे अमोल चंदनशिवे असे नाव आहे. नगरपालिकेकडे अत्यावश्यक सोयी- सुविधा नसल्याने ही घटना घडल्याचे समोर येत आहे.

प्रत्यक्ष घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड नगरपालिकेचे अनिरूध्द लाड व अमोल चंदनशिवे हे वाखाण परिसरातील भुयारी गटर साफ करीत होते. मात्र स्वच्छता करीत असताना त्यांचा श्वास गुदमरल्याने ते बेशुद्ध पडले होते. ही बाब लक्षात येताच त्यांना सुरुवातीला उपजिल्हा रुग्णालयात तर नंतर कृष्णा रुग्णालयात नेण्यात आले. पण यात एकाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले आहे. तर जखमीवर उपचार सुरू आहेत.

Web Title: One person died of suffocation while cleaning subway gutters, incident in Karad satara district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.