इमारतीवरुन उडी मारल्याने एक जण गंभीर

By admin | Published: March 11, 2017 09:11 AM2017-03-11T09:11:48+5:302017-03-11T09:11:48+5:30

मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सेव्हन स्टार इमारतीवरुन उडी मारल्याने एक जण गंभीर जखमी झाला.

One person is serious about jumping from the building | इमारतीवरुन उडी मारल्याने एक जण गंभीर

इमारतीवरुन उडी मारल्याने एक जण गंभीर

Next

 ऑनलाईन लोकमत 

सातारा, दि. 11 - मध्यवर्ती बसस्थानकाजवळील सेव्हन स्टार इमारतीवरुन उडी मारल्याने  एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी सकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. संतोष गोपाळ कांबळे (वय 40) असे या व्यक्तीचे नाव असून ते सोलापूर येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे.
 
दरम्यान, चौकशीदरम्यान कांबळेंच्या खिशात एक चिठ्ठी सापडली. यात 'मी करमाळा येथील रहिवासी आहे'. व त्यात संपर्कासाठी फोन नंबरही नमूद करण्यात आला होता. 
 
या घटनेत कांबळे यांच्या डोक्याला मोठी इजा झाली असून एक पायाला फ्रॅक्चर झाले आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांचे नातेवाईक साता-याकडे रवाना झाले आहेत.  
 

Web Title: One person is serious about jumping from the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.